कला- क्रीडा शिक्षकांच्या तासिक अखेर पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:27 PM2017-10-12T13:27:47+5:302017-10-12T13:28:07+5:30

अहमदनगर : राज्यसरकारने कला-क्रीडा शिक्षकांच्या कमी केलेल्या तासिका शिक्षकांच्या आंदोलनानंतर अखेर पूर्ववत करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे कला-क्रीडा शिक्षकांमध्ये आनंदाचे ...

Art- Sports teachers finally retire | कला- क्रीडा शिक्षकांच्या तासिक अखेर पूर्ववत

कला- क्रीडा शिक्षकांच्या तासिक अखेर पूर्ववत

अहमदनगर : राज्यसरकारने कला-क्रीडा शिक्षकांच्या कमी केलेल्या तासिका शिक्षकांच्या आंदोलनानंतर अखेर पूर्ववत करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे कला-क्रीडा शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़
२८ एप्रिल रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकाने कला-क्रीडा विषयाच्या तासिका ५० टक्केने कमी केल्या होत्या़ त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भरातून कला-क्रीडा शिक्षकांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले होते़ त्यामुळे २३ आॅगस्ट रोजी कला-क्रीडा शिक्षक संघटनांसोबत शिक्षणमंत्र्यांनी बैठक घेतली़ या बैठकीत तासिका पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. पण मध्यंतरीच्या काळात परिपत्रक निघण्यास उशीर झाल्याने कला-क्रीडा शिक्षक हवालदिल झाले होते. अखेर राज्यसरकारने ५ आॅक्टोबरला परिपत्रक काढून तासिक पूर्ववत करण्याचा आदेश काढला़ हा लढा यशस्वी करण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनांमध्ये क्रीडा महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, राज्य समन्वयक आप्पासाहेब शिंदे, सचिव शिवदत्त ढवळे, संजय पठाडे, डॉ़ अरुण खोडस्कर, विनोद इंगोले, प्रल्हाद साळुंके, प्रल्हाद शिंदे, वेणुनाथ कडू, घनशाम सानप, लिंबकर जितेंद्र, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गागरे, सचिव शिरीष टेकाडे, राज्य संघटक महेंद्र हिंगे, नितीन घोलप, बाबा बोडखे, अशोक डोळसे, भानुदास तमनर, विजय जाधव, दत्तात्रय नारळे, सुनील जाधव, अनिल पटारे, राजेंद्र कोहकडे, बाळासाहेब कांडेकर, सोपान लांडे, प्रताप बांडे, बबन गायकवाड, भरत बिडवे, शंकर बारस्कर, दिलीप काटे, दत्ता नेवसे, आदिनाथ पाचपुते, तुवर पाटील, शिवाजी वाबळे, बळीराम सातपते, संजय कंगले, दिनेश भालेराव, शिवप्रसाद घोडके, गणेश म्हस्के आदींनी सहभाग घेतला़

Web Title: Art- Sports teachers finally retire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.