कृत्रिमरित्या पिकविलेला साडेचार क्विंटल आंबा केला नष्ट
By Admin | Published: May 15, 2014 10:47 PM2014-05-15T22:47:37+5:302023-10-30T11:16:29+5:30
अहमदनगर: आंब्यावरील कृत्रिमचा डाग यंदा तरी पुसण्याची चिन्हे नाहीत़ कृत्रिमरित्या आंबा पिकवून बाजारात विक्रीसाठी आलेल्या आंब्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे.
अहमदनगर: आंब्यावरील कृत्रिमचा डाग यंदा तरी पुसण्याची चिन्हे नाहीत़ कृत्रिमरित्या आंबा पिकवून बाजारात विक्रीसाठी आलेल्या आंब्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे. इतर काही दुकानातील आंब्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत़ या कारवाईमुळे आंब्याच्या बाजारात खळबळ उडाली आहे़ यंदा आंब्याला युरोपात बंदी घालण्यात आली आहे़ कृत्रिमरित्या आंबा पिकविल्याचा ठपका युरोपीय राष्ट्रांनी ठेवला आहे़ परिणामी विदेशात निर्यात झाली नाही़ त्यामुळे आंब्याचे भाव गडगडले आहेत़ उत्पादक शेतकरी अडचणीत तर ग्राहक जाम खूष, अशी बाजारातील स्थिती आहे़ कृत्रिम आंबा पिकविण्याच्या सवयीमुळे उत्पादक आंतराष्ट्रीय बाजारपेठ गमावून बसले आहेत़ असे असले तरी व्यापार्यांची कृत्रिम आंबा पिकविण्याची खोड काही केल्या जात नाही़ कृत्रिमरित्या पिकविलेला आंबा सर्रास बाजारात विक्रीसाठी येत आहे़ पांढरी पावडर टाकून पिकविलेला आंबा मार्केयार्डमध्ये विक्रीसाठी आल्याची माहिती येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना खबर्यामार्फत मिळाली़ प्राप्त महितीच्या आधारे अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त के ़एस़ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यु़ आऱ कावळे यांच्या पथकाने मार्केट यार्डमधील आंब्याचे व्यापारी बोटमल अमरचंद यांच्या दुकानावर छापा टाकून ४०० किलो आंबा जप्त केला़ आंब्याचे दुसरे व्यापारी सिकंदर रहेमान बागवान यांच्याकडील ६० किलो आंबा जप्त करून नष्ट केला़ आंबा नैसर्गिकरित्या पिकण्यास उशिर लागतो़ आंब्याची एक आढी किमान आठ दिवसांत पिकते़ पिकू घातलेला आंबा आठ दिवसानंतरच बाजारात आणता येतोे़ आठ दिवसांत भावात चढउतार होण्याची भीती असते़ त्यामुळे झटपट आंबा पिकविण्यासाठी व्यापार्यांनी कारपेटचा पर्याय शोधून काढला़ हा एक प्रकारचा गॅस आहे़ त्यामुळे आंबा पिकत नाही़ आतून ती कैरीच असते़ फक्त रंग बदलतो़ हिरवी कैरी पिवळी होते़ आतून तो कडक असतो़ त्याला आंब्याची चव नसते़ हा आंबा शरिरास घातक आहे़ त्यामुळे हा आंबा नागरिकांच्या खाण्यात जाणार नाही, याची काळजी प्रशासन घेत आहे. अनेक दुकानातील आंब्याचे नमुने घेण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी) असा पिकतो आंबा आंब्याच्या विविध जातींच्या कैर्या विकत आणल्या जातात़ कैर्या आणून त्याची आढी लावली जाते़ परंतु हा आंबा पाडाला लागला होता किंवा नाही,हे तपासले जात नाही़ परिणामी तो पिकत नाही़ त्यामुळे कमीवेळेत आंबा पिकविण्यासाठी कारपेट टाकून आंबा पिकविला जातो़ यामुळे आंब्याला पिवळा रंग येतो़ चव येत नाही़ कृत्रिमरित्या पिकविलेल्या आंब्याला चव नसते़ तो पूर्णपणे कडक असतो़ क़ृत्रिमरित्या पिकविलेला आंबा आरोग्यास घातक आहेक़ोणतेही दूषित अन्न पोटात गेल्यास त्याचे अनेक परिणाम होतात़अन्ननलिका, जठरावर त्याचा परिणाम होतो़ विषारी पदार्थाची तीव्रता अधिक असल्यास किडनीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते़ - डॉ़सतीश राजूरकर, आरोग्य अधिकारी, महापालिका शहरात पांढरी पावडर टाकून आंबा पिकविला जात असल्याची माहिती मिळाली़ प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित व्यापार्यांच्या दुकानावर छापा टाकला असता पांढरी पावडर टाकून आंबा पिकविल्याचे उघड झाले़ त्यामुळे हा आंबा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे़ - के ़एस़ शिंदे, सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन