अहमदनगरमधून राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप रिंगणात  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 03:20 PM2019-03-14T15:20:40+5:302019-03-14T15:36:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

Arun Jagtap front runner for NCP in Ahmednagar | अहमदनगरमधून राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप रिंगणात  

अहमदनगरमधून राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप रिंगणात  

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. अरुण जगताप यांची लढत भाजपाचे डॉ. सुजय विखे यांच्याशी होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामाला लागा असे आदेश दिले.

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे त्यांची लढत भाजपाचे डॉ. सुजय विखे यांच्याशी होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामाला लागा असे आदेश दिले. थोड्याच वेळात उमेदवारीची घोषणा केली जाणार आहे. 

बुधवारी दिवसभरात राष्ट्रवादीच्या गोटात वेगाने हालचाली घडल्या. शरद पवार यांनी काल जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मते जाणून घेतली. मात्र निर्णय जाहीर केला नाही.  जगताप यांच्या उमेदवारीबाबत आज पुन्हा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या उमेदवारीबाबत आग्रह धरला होता. त्यामुळे दुपारपर्यंत संभ्रम होता. अखेर आमदार अरुण जगताप यांच्या नावावर एकमत झाले. 

कालपर्यंत काँग्रेसचे दिवगंत नेते शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा अनुराधा नागवडे, पारनेर तालुक्यातील युवा नेते निलेश लंके यांचीही नावे चर्चेत आली. राष्ट्रवादीकडून पवार कोणाला रिंगणात उतरवतात याकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या नावावर पवारांनी शिक्कामोर्तब केले.

आमदार अरूण जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले. अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भुषविले. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र् क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य आहेत. गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. आमदार अरुण जगताप हे सलग दोनवेळा विधानपरिषदेवर ते निवडून गेले आहेत. 

-  सुपुत्र संग्राम अरुण जगताप नगर शहरातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

- स्नुषा शितल संग्राम जगताप या अहमदनगर पालिकेत नगरसेविका आहेत.

- स्नुषा सुवर्णा सचिन जगताप जिल्हा परिषद सदस्या आहेत.

 - सुपुत्र सचिन अरुण जगजाप हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. 

- आमदार अरुण जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे व्याही

- आमदार संग्राम जगताप हे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई

Web Title: Arun Jagtap front runner for NCP in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.