विकासासाठी तनपुरेच हवेत-अरुण तनपुरे; राहुरीत विजय तमनर राष्ट्रवादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 02:21 PM2019-10-14T14:21:04+5:302019-10-14T14:21:39+5:30
राहुरी तालुक्याच्या विकास खुंटला आहे. पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आमदारांना राहुरी तालुक्याचे देणेघेणे नाही. त्यामुळे तालुक्याचे प्रश्न सुटण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांना साथ द्या, असे आवाहन राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी केले.
राहुरी : तालुक्याच्या विकास खुंटला आहे. पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आमदारांना राहुरी तालुक्याचे देणेघेणे नाही. त्यामुळे तालुक्याचे प्रश्न सुटण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांना साथ द्या, असे आवाहन राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी केले.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत यशवंत सेना काम करणार आहे. यशवंत सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय तमनर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तनपुरे बोलत होते. राहुरी येथील बिरोबानगर परिसरात गंगाधर तमनर यांच्या अध्यक्षतेखाली सेनेचा मेळावा संपन्न झाला़. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पांडुरंग निरगळ यांनी खासदार शरद पवार यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतल्याने प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत काम करणार असल्याचे सांगितले.
भाजपला सत्तेतून खाली खेचले जाईल, असा इशारा पांडुरंग निरगळ यांनी दिला़ यावेळी गंगाधर बाचकर, विजय तमनर, यशवंत प्रहार संघटनेचे अध्यक्ष डॉ़ शशिकांत तरंगे यांनी भाषणे केली.
कार्यक्रमास दत्ताभाऊ खेडेकर, दादासाहेब तमनर, आप्पासाहेब सरोदे, शहाजी विटनोर, संतोष नजन, भारत मतकर, अनिल माने, डॉ़स्वप्नील माने, भागवत झडे, राजू वाघ, आण्णासाहेब बाचकर, श्रीकांत बाचकर उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल डोलनर यांनी केले़. आभार ज्ञानेश्वर बाचकर यांनी मानले़.
विकासासाठी सोबत-प्राजक्त तनपुरे
वंचित बहुजन आघाडीचे तिकीट विजय तमनर यांना मिळाले होते़. मात्र जनतेच्या हितासाठी त्यांनी माझ्यासोबत राहण्याचा मनाचा मोठेपणा दाखविला आहे़. तरूणांची वैचारिक पातळी वाढलेली आहे़. न्याय हक्काचा पाठपुरावा केला जाईल़. धूळखात पडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी उमेदवारी करीत आहे़. चांगले काम करून राहुरीला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देईल़, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.