पोलीस माघारी फिरताच घातला डोक्यात दगड
By अण्णा नवथर | Published: April 7, 2023 05:09 PM2023-04-07T17:09:09+5:302023-04-07T17:09:36+5:30
काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस घटनास्थळी दाखल होतात.
अहमदनगर : काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस घटनास्थळी दाखल होतात. पोलिस येऊन गेल्यानंतर शक्यतो कुणी मारहाण करण्याची हिंमत करत नाही. बोल्हेगावात मात्र पोलिस घरी भेट देऊन गेल्यानंतर आरोपीने एकाच्या डोक्यात दगड घातला. ही घटना गुरुवारी ( दि. ६) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिसांचा धाक संपला आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी दिनेश मिसाळ ( रा. रेणुकानगर, बोल्हेगाव ) याच्यावर मारहाण केल्याचा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संतोष संभाजी मुठे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलगा यश मुठे याचा गुरुवारी ( दि. ६ ) वाढदिवस हाेता. वाढदिवसासाठी त्यांनी जवळच्या काही लोकांना बोवलेले होते. वाढदिवस साजरा करून झाल्यानंतर ते सर्व रात्री अकरा वाजेच्या सुमारास जेवण्यासाठी बसलेले असता आरोपी दिनेश मिसाळ तिथे आला व तुम्हाला जेवण करू देणार नाही, असे म्हणत तो मोठ- मोठ्याने शिविगाळ करू लागला.
त्यामुळे मुठे यांनी घराचा दरावाजा बंद करून डायल ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. काहीवेळातच पोलिस मुठे यांच्या घरी दाखल झाले. पोलिसांनी मुठे यांना तक्रार देण्यास सांगून ते आरोपीच्या शोध घेण्यासाठी निघून गेले. त्यानंतर काहीवेळाने दिने मिसाळा हा पुन्हा मुठे यांच्या जवळा आला. त्याने संतोष मुठे यांना शिविगाळ करत मारहाण केली. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेला दगड उचलून त्याने मुठे यांच्या डोक्यात मारला. त्यात मुठे जखमी झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.