मराठ्यांना आरक्षण नाही तोवर 'या' गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी
By सचिन धर्मापुरीकर | Published: October 21, 2023 04:07 PM2023-10-21T16:07:12+5:302023-10-21T16:07:32+5:30
नेत्यांना गाव बंदी; करंजीत ठाण मांडून बसले तरूण
कोपरगाव (जि. अहमदनगर) : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकिय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय तालुक्यातील करंजी येथील मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी घेण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी गावातील सामाजिक सभागृहाजवळ तरूणांनी ठाण मांडून नेत्यांना गावात येऊ न देण्याचा निर्धार केला.
जरांगे पाटील मित्र मंडळ व करंजी येथील मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी कोणत्याही राजकिय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा आशयाचा मजकूर व्हॉट्सॲप व फेसबुकवर व्हायरल करण्यात आला. शनिवारी सकाळीच करंजी येथील सामाजिक सभागृहाजवळ गावातील मराठा समाजाचे तरूण एकत्र आले. त्यांनी मंडप टाकून गावात कोणताही नेता येऊ नये, यासाठी ठाण मांडले.
कोपरगाव येथील सकल मराठा समाजाचे अनिल गायकवाड, ॲड. योगेश खालकर, विनय भगत करंजी गावात गेले. त्यांनी गाव बंदीचा निर्णयाचे स्वागत केले. या आंदोलनात करंजी येथील गोरख नाना भिंगारे, शिवाजी जाधव, विकास शिंदे, आप्पासाहेब आगवण, शशिकांत शेळके, लक्ष्मण शेळके, नानासाहेब भिंगारे, निलेश येवले, गोकूळ जाधव, रोहीत भिंगारे, रोहित शेळके, गोकूळ फापाळे, रावसाहेब भिंगारे, हर्षल आगवण, बाळासाहेब आगवण, राहूल भिंगारे, उमेश उसरे, आकाश भिंगारे, चंद्रकांत भिंगारे, महेंद्र शिंदे, गणेश शिंदे, जितेंद्र शेळके, विशाल आगवण, लखन घाटे, सूनिल भिंगारे, दादासाहेब जोर्वेकर आदी सहभागी झाले आहेत.