आमदारांकडून न केलेल्या कामाचे श्रेय-आशुतोष काळे; पोहेगावात प्रचारसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 05:39 PM2019-10-18T17:39:01+5:302019-10-18T17:39:39+5:30
काकडी विमानतळ कोणी आणले? न्यायालयाची इमारत कोणी बांधली हे तालुक्याच्या जनतेला माहित आहे. तालुक्याच्या आमदारांनी आपण न केलेल्या कामांचे प्रगती पुस्तक भरवण्यासाठी जुनेच फोटो वापरले आहेत. २०१२ साली पूर्ण झालेल्या न्यायालयाच्या इमारतीचा फोटो व काकडी विमानतळाचा फोटो छापून न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका आशुतोष काळे यांनी केली.
कोपरगाव : काकडी विमानतळ कोणी आणले? न्यायालयाची इमारत कोणी बांधली हे तालुक्याच्या जनतेला माहित आहे. तालुक्याच्या आमदारांनी आपण न केलेल्या कामांचे प्रगती पुस्तक भरवण्यासाठी जुनेच फोटो वापरले आहेत. २०१२ साली पूर्ण झालेल्या न्यायालयाच्या इमारतीचा फोटो व काकडी विमानतळाचा फोटो छापून न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका आशुतोष काळे यांनी केली.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी काळे बोलत होते.
काळे म्हणाले, बंधारा किती वेळा फुटला आणि आज या बंधा-याची काय परिस्थिती आहे. तालुक्यातील शेतक-यांनी मंजूर येथे जाऊन पाहिल्यावर तालुक्याच्या आमदार किती निष्क्रिय होत्या. याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. शेतकºयांना पाणी मिळवून देणे हे तालुक्याच्या आमदारांचे कर्तव्य असतांना अडीच किलोमीटरपर्यंतच शेतीसाठी पाणी दिले.
हॅरीसन ब्रँच चारीचे फाटक वेल्डिंग करायला लावून शेतक-यांना पाण्यापासून वंचित ठेवणाºया तालुक्याच्या आमदारांना धडा शिकवण्याची संधी सोडू नका. मागील पाच वर्षात मतदार संघातील जनतेसाठी रस्त्यावरची, न्यायालयीन लढाई लढलो. मी केलेला संघर्ष जनतेच्या हृदयात आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले, मित्र पक्षांना हवा असलेला उमेदवार मिळाल्यामुळे तालुक्यात अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.