उधारी मागितल्याने टपरीचालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:48 PM2018-08-23T12:48:11+5:302018-08-23T12:48:42+5:30
उधारीचे पैसे मागितल्याने टपरीचालकाला फायटरने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली़ मंगळवारी सायंकाळी ४ वाजता नवनागापूर येथील गजानन कॉलनी येथे ही घटना घडली.
अहमदनगर : उधारीचे पैसे मागितल्याने टपरीचालकाला फायटरने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली़ मंगळवारी सायंकाळी ४ वाजता नवनागापूर येथील गजानन कॉलनी येथे ही घटना घडली. याप्रकरणी विशाल हरिंद्र सिंग (वय २०) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नितेश उर्फ पिंट्या केदारे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ मंगळवारी सायंकाळी ४ वाजता विशाल हरिंद्र सिंग हा टपरीत बसलेला असताना तेथे केदारे आला़ सिंग याने केदारे याला पानटपरीचे उधारीचे पैसे मागितले़ यावेळी केदारे याने सिंग याला पोटावर, छातीवर लाथाबुक्या व फायटरने बेदम मारहाण केली़ पोलीस कॉन्स्टेबल कटारे हे पुढील तपास करत आहेत़