कल्याणरोडवरील रस्त्याचे डांबरीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:33+5:302021-02-24T04:22:33+5:30

अहमदनगर : कल्याणरोड येथील गणेशनगरचा मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे ...

Asphalt the road on Kalyan Road | कल्याणरोडवरील रस्त्याचे डांबरीकरण करा

कल्याणरोडवरील रस्त्याचे डांबरीकरण करा

अहमदनगर : कल्याणरोड येथील गणेशनगरचा मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली आहे.

मंगळवारी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, गणेशनगर हा परिसर अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. गणेशनगर जवळच संजय सोसायटी, विणकर सोसायटी, शांतीनगर व रायगड हाइट्स इत्यादी ठिकाणे आहेत. सुमारे पाचशे कुटुंब वास्तव्य करून राहत आहेत. अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत. गणेश नगर येथील रस्ते पावसामुळे खराब झाले आहेत. सर्वांना जाण्यासाठी गणेशनगरमधील मुख्य रस्ता हाच एकमेव रस्ता आहे. येथील रहिवाशांना व शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना सतत या रस्त्याचा वापर करावा लागतो. खराब रस्त्यांमुळे रहिवाशांना जीव मुठीत धरून चालावे लागते. आमदार स्थानिक विकास निधीतून मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते डांबरीकरण करून द्यावेत, अशी मागणी गणेशनगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे.कल्याणरोड येथील गणेशनगरचा मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते डांबरीकरण करून मिळणे बाबत आ. जगताप यांना गणेशनगर परिसरातील स्थानिक नागरिकांकडून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी गणेशनगर सोसायटीचे चेअरमन गणेश शिंदे, अनिल राऊत, अतुल वामन, सदाभाऊ शिंदे, सागर शिंदे, मनोज कुंजीर, सुबोध कुलकर्णी, राजेंद्र ताकपेरे, राजू वाळके, महेश शिरसुल, महेश रसाळ, आण्णा जंगम, अशोक तावरे, गणेश मंचिकटला, नाना देवतरसे, उमेश गोरे, विकी सुपेकर, धर्मनाथ घोरपडे, विशाल माने, पोपट शेळके, महादेव जगताप, नितीन गाली, राजकुमार शिंदे, राजू तेल्ला, संतोष लयचेट्टी आदी उपस्थित होते.

-----

फोटो- २३ कल्याण रोड

कल्याणरोड येथील गणेशनगरचा मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते डांबरीकरण करून मिळणे स्थानिक नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांना निवेदन दिले.

Web Title: Asphalt the road on Kalyan Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.