नेप्तीनाका रस्त्याच्या काँक्रिटीकरणावर डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:52+5:302021-02-24T04:22:52+5:30
अहमदनगर : येथील दिल्लीगेट ते नेप्तीनाका रस्त्यावर काँक्रिटकरण करण्यात आलेले आहे. या रस्त्यावर आता महापालिकेने डांबरीकरण केले आहे. काँक्रिटवर ...
अहमदनगर : येथील दिल्लीगेट ते नेप्तीनाका रस्त्यावर काँक्रिटकरण करण्यात आलेले आहे. या रस्त्यावर आता महापालिकेने डांबरीकरण केले आहे. काँक्रिटवर डांबर टाकण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे.
महापालिकेचे हे डांबरीकरण सध्या शहरातील चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्लीगेट ते नेप्तीनाक, या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता नादुरुस्त होत असल्याने या मार्गावर सन २०१० मध्ये काँक्रिट टाकण्यात आले. या कामाची मुदत दन वर्षांची होती. ही मुदत संपली. दरम्यानच्या काळात या रस्त्याच्या बाजूने जलवाहिनी टाकण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठे खड्डे पडले. तसेच अनेक ठिकाणी खडी निखळली होती. त्यामुळे या मार्गावर वाहने घसरून अपघात होत असल्याने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन महापालिकेच्या बांधकाम विभागाने ४५० मीटर डांबरीकरण केले. हे काम वाहतुकीची कोंडी होऊन म्हणून रात्रीच करण्यात आले. सुमारे सात लाख रुपये खर्चून हे काम करण्यात आले आहे.
...
निधीअभावी डांबरीकरण
दिल्लीगेट ते नेप्तीनाका रस्त्यावरील काँक्रिटीकरण करण्यासाठी ५२ लाखांचा खर्च होता. महापालिकेची अर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे निधी उपलब्ध नसल्याने डांबरीकरण करण्यात आले असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
....