सख्ख्या चुलत बहिणीवर अत्याचार; भावाविरोधात गुन्हा दाखल, पीडित मुलगी गरोदर
By शेखर पानसरे | Published: March 11, 2023 06:44 PM2023-03-11T18:44:09+5:302023-03-11T18:45:29+5:30
संगमनेर (अहमदनगर) : वीस वर्षीय युवकाने त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन सख्या चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केले. ही घटना तालुक्याच्या ...
संगमनेर (अहमदनगर) : वीस वर्षीय युवकाने त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन सख्या चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केले. ही घटना तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका गावात घडली. पिडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे. या प्रकरणी शुक्रवारी (दि. १०) तिच्या आईने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.
पीडित मुलीला लोणी (ता. राहाता) येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन कुटुंबातील एका भावाच्या वीस वर्षीय मुलाने हा प्रकार केला. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याने गेल्या सात-साडेसात महिन्यांत वेळोवेळी अत्याचार केले. त्यातून पिडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी वीस वर्षीय तरुणाविरोधात अत्याचाराचे कलमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. के. ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप अधिक तपास करीत आहेत.