विधानसभेचे रण पेटले
By Admin | Published: May 18, 2014 11:23 PM2014-05-18T23:23:42+5:302024-03-26T15:09:05+5:30
अकोले : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्धार केला असून, येत्या काही दिवसांत त्यांचा प्रवेश निश्चित समजला जातआहे.
अकोले : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्धार केला असून, येत्या काही दिवसांत त्यांचा प्रवेश निश्चित समजला जातआहे. ठाकरे देतील ती जबाबदारी स्वीकारू, असे सांगत त्यांनी या चर्चेला दुजोराही दिला. परंतु भांगरेंच्या या भूमिकेमुळे स्थानिक सेना पदाधिकार्यांची अस्वस्थता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने सगळीकडेच उलथापालथ झाली. पक्षादेश किंवा आघाडी धर्म झुगारून अनेक पदाधिकार्यांनी आपापली गणिते जुळवण्याचा प्रयत्न केला. अकोल्यातही असेच काहिसे घडले. आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचे काँग्रेस, तसेच राष्ट्रवादी नेत्यांच्या बालेकिल्ल्यातच मताधिक्य घटले. भांगरे मित्रमंडळाने सेनेच्या विजयाचे अभिनंदन करणारे ‘फ्लेक्स’ शहरभर झळकावून उघडउघड युतीला मदत केल्याचे संकेत दिले. नंतर खुद्द अशोक भांगरे यांनी सेनेत जाण्याची इच्छा व्यक्त केली. यामागे आगामी विधानसभेत सेनेकडून उमेदवारी मिळवण्याची त्यांची आकांक्षा लपून राहिलेली नाही. नेमक्या याच कारणातून सेना उपजिल्हा प्रमुख मधुकर तळपाडे गटात कमालीची अस्वस्थता आहे. आपणच उमेदवारीचे दावेदार असल्याचे सांगून तळपाडे यांनी सावध भूमिका घेतली आहे. भांगरे यांनी आगामी उमेदवारीच्या महत्वाकांक्षेतून सेनेत प्रवेशाचा निर्धार केला असला तरी आज ते त्यावर उघड भाष्य करीत नाहीत. प्रवेशानंतर सेनाप्रमुख उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी पार पाडू, असे सांगत त्यांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याचे सध्या तरी दिसते. (तालुका प्रतिनिधी) भांगरे घराण्याने पिचडांच्या विरोधात गेली ३०-४० वर्षे निवडणुका लढविल्या आहेत. २००४ला मी सेनेकडून निवडणूक लढविली. अवघ्या दोन-अडीच हजार मतांनी पराभव झाला. पुन्हा सेनेने उमेदवारी दिली तर लढू. नाहीतर शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे जी जबाबदारी देतील ती स्वीकारु - अशोक भांगरे, ज्येष्ठ नेते, काँग्रेस अकोल्यात लागलेले फ्लेक्स दिशाभूल करणारे आहेत. सेनेचे संपर्क प्रमुख सुहास सामंत यांच्याशी बोलणे झाले असून आगामी विधानसभेसाठी मीच प्रमुख दावेदार आहे- - मधुकर तळपाडे, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना भांगरे मित्रमंडळाने माझा फोटो मला न विचारता फ्लेक्सवर छापला आहे. आमचे नेते मधुकर तळपाडे आहेत. या निवडणुकीत महायुती पुढेच आहे. राजकारणात काहीही होऊ शकते! विधानसभेची उमेदवारी कुणाला मिळेल हे सांगता येत नाही. - मछिंद्र धुमाळ, तालुकाप्रमुख, शिवसेना