म्युकरमायकोसिस रुग्णांना प्रत्येकी ५० हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:40+5:302021-06-25T04:16:40+5:30

महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कान, नाक, घसा तज्ज्ञांची बैठक झाली. यावेळी उपायुक्त यशवंत ...

Assistance of Rs 50,000 each to the patients with mucomycosis | म्युकरमायकोसिस रुग्णांना प्रत्येकी ५० हजारांची मदत

म्युकरमायकोसिस रुग्णांना प्रत्येकी ५० हजारांची मदत

महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कान, नाक, घसा तज्ज्ञांची बैठक झाली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, समितीचे सदस्य सचिन जाधव, निखिल वारे, संजय ढोणे, सतीश शिंदे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीष राजूरकर, डॉ. गजानन काशीद, डॉ. धनंजय कुळकर्णी, डॉ. संजय आसनानी, डॉ. योगेश बुधानी, डॉ. मंगेश जाधव, डॉ. राहुल आनंद, डॉ. विजयनाथ गुरुवाले आदी उपस्थित होते. यावेळी बोरुडे म्हणाले की, म्युकरमायकोसिस रुग्ण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अहमदनगर महापालिका उपाययोजना करण्यासाठी सज्ज आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक निर्माण करण्यासाठी पाठपुरवा सुरू आहे. महापालिकेच्या वतीने या रुग्णांना अर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे यावेळी बोरुडे यांनी सांगितले.

...

सूचना फोटो आहे.

Web Title: Assistance of Rs 50,000 each to the patients with mucomycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.