अस्तगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:06+5:302021-07-07T04:26:06+5:30
अस्तगाव : राहाता तालुक्यातील अस्तगाव ग्रामपंचायत कर्मचारी विकास भास्कर नळे यांना दुकानदाराने मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी राहाता तालुका ...
अस्तगाव : राहाता तालुक्यातील अस्तगाव ग्रामपंचायत कर्मचारी विकास भास्कर नळे यांना दुकानदाराने मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी राहाता तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियन यांनी तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन दिले.
सोमवारी अस्तगाव ग्रामपंचायत व तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियन यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज बंद ठेवले, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष राहुल पोकळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी व अस्तगाव ग्रामपंचायत यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि.२) संध्याकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत कर्मचारी नळे हे अस्तगाव येथील चोळकेवडी शिवारातील दुकान बंद करण्यास गेले असता त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाण करण्यात आली, असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राहुल पोकळे, उपाध्यक्ष शकील पठाण, कार्याध्यक्ष मधुकर घोरपडे, सचिव योगेश गोसावी, सचिन जेजुरकर, विकास नळे, भाऊराव तांबे, रवींद्र गुंजाळ, शांताराम शिनगारे, थॉमस बनसोडे, शुभम गायकवाड, अनिल भवर, मिलिंद गमे, आप्पासाहेब तुपे, दत्तात्रय लांडे, कैलास साळुंके, राजेंद्र बनसोडे, रमेश डांगे, सुधीर आरने, अंकुश पवार, प्रवीण ढोकचौळे, नितीन बोर्डे, अमोल डांगे, सचिन कोल्हे, प्रभाकर कदम उपस्थित होते.