अॅट्रॉसिटी पीडित आक्रोश मोर्चा काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:00 AM2018-04-30T05:00:05+5:302018-04-30T05:00:08+5:30
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पाठिंब्यासाठी व सरकारने दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेच्या निषेधार्थ मेअखेरीस राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी सामूहिक आक्रोश मोर्चे काढणार
अहमदनगर : अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पाठिंब्यासाठी व सरकारने दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेच्या निषेधार्थ मेअखेरीस राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी सामूहिक आक्रोश मोर्चे काढणार असल्याचे शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा मराठा क्रांती मूकमोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर यांनी सांगितले.
अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराने पीडित झालेल्यांची राज्यव्यापी खुली बैठक रविवारी येथे झाली. भोर म्हणाले, अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुभाष महाजन यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय त्रोटक स्वरूपाचा आहे़ पण, मतांच्या राजकारणासाठी सरकारने संपूर्ण याचिकेलाच आव्हान देणारी दुसरी याचिका दाखल केली आहे़ बैठकीला विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.