दूध दरवाढीसाठी राहात्यात शेतक-यांचे नगर-मनमाड रस्त्यावर आसूड आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:55 PM2020-08-01T13:55:07+5:302020-08-01T13:55:50+5:30

 माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आणि विविध मागण्यासाठी शेतक-यांनी राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर शनिवारी (१ आॅगस्ट)  रास्ता रोको करीत आसूड आंदोलन केले. 

Asud agitation of farmers on Nagar-Manmad road for increase in milk price | दूध दरवाढीसाठी राहात्यात शेतक-यांचे नगर-मनमाड रस्त्यावर आसूड आंदोलन 

दूध दरवाढीसाठी राहात्यात शेतक-यांचे नगर-मनमाड रस्त्यावर आसूड आंदोलन 

लोणी/राहाता :  माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आणि विविध मागण्यासाठी शेतक-यांनी राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर शनिवारी (१ आॅगस्ट)  रास्ता रोको करीत आसूड आंदोलन केले. 

यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, गणेशचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, राजेंद्र पिपाडा, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, बाजार समिती उपसभापती वाल्मीक गोर्डे, पंचायत समिती उपसभापती ओमेश जपे, भाजपाचे सचिन तांबे, नंदकुमार जेजूरकर आदी उपस्थीत होते.

महविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे दूध संघ असून आपले स्वत:चे फायदे व्हावेत. दूध संघाला नफा मिळावा आणि अनुदान देण्यापेक्षा अनुदान लाटण्याचे काम मंत्री करीत असल्याचा आरोप भाजप नेते राधाकृष्ण विखे यावेळी केला.  यापूर्वीच्या सरकारने जाहीर केलेले  ५ रुपये अनुदान गेले कुठे? असा सवालही त्यांनी केला.
 

Web Title: Asud agitation of farmers on Nagar-Manmad road for increase in milk price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.