बहुजन मुक्ती पार्टीचा श्रीगोंद्यात आसूड मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:26+5:302021-06-16T04:29:26+5:30
श्रीगोंदा : बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने श्रीगोंदा शहरामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात तसेच महागाई विरोधात दे धक्का ...
श्रीगोंदा : बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने श्रीगोंदा शहरामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात तसेच महागाई विरोधात दे धक्का आंदोलन व आसूड मोर्चा काढण्यात आला.
श्रीगोंदा बसस्थानकापासून तहसील पर्यंत आयोजित मोर्चामध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी दुचाकी व चार चाकी ढकलत नेऊन तहसील कार्यालयावर आसूड मोर्चाचे रूपांतरण सभेमध्ये झाले. तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देण्यात आले.
बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत यांनी
केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील आघाडी सरकार यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, महागाई गगनाला भिडलेली आहे. कोरोना महामारीमुळे जनतेचे अत्यंत हाल झालेले असताना केंद्र व राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेचा विद्रोह जर टोकास गेला तर देशात कोरोनाची नव्हे तर क्रांतीची तिसरी लाट येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष समीर शिंदे, अनिल शिंदे, सुरेश रणनवरे, कालिदास सावंत, रामदास मले, सुनील काकडे, भाऊसाहेब फुलमाळी, नारायण शिंदे, मोहन शिंदे, रमेश शिंदे, सर्जेराव शिंदे आदी उपस्थित होते.
..........
१५ श्रीगोंदा आसूड आंदोलन