स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडले; २७ लाखाची रक्कम चोरीस 

By सुदाम देशमुख | Published: April 7, 2023 03:56 PM2023-04-07T15:56:10+5:302023-04-07T15:57:22+5:30

लोणीव्यंकनाथचे हे एटीएम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे.

atm machines of state bank were broken sum of 27 lakh was stolen | स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडले; २७ लाखाची रक्कम चोरीस 

स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडले; २७ लाखाची रक्कम चोरीस 

सुदाम देशमुख, अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ लाखाची रोकड लंपास केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री  घडली असून शुक्रवारी उघडकीस आली. लोणीव्यंकनाथचे हे एटीएम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे. 

घटनास्थळास पोलिस उपनिरीक्षक अमित माळी पोलिस काॅस्टेबल व्ही. एम. बडे यांनी भेट दिली. गुरुवारी रात्री दोन बुरखाधारी चोरटे आले. त्यांनी सुरुवातीला वीज कनेक्शन कट केले. यामध्ये शेजारील शिवशंभो कापड दुकानाचेही वीज कनेक्शन कट झाले. सीसीटीव्ही कॅमेरा हाताने फिरवला आणि कॅश ठेवण्याचे लाॅकर गॅस कटरच्या सहाय्याने कापले आणि सुमारे २७ लाखाची रक्कम घेऊन फरार झाले. 
सकाळी नऊ वाजता दुकान उघडण्यासाठी सुहास काकडे आले. लाईट लागेना म्हणून मीटर पाहिले असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिस पाटील मनेश जगताप यांना खबर दिली दिली. 

गुरुवारी दुपारी या एटीएम मशीन मध्ये ३२ लाख टाकले होते. सुमारे पाच लाखाची रक्कम ग्राहकांनी काढली असावी, त्यामुळे २७ लाखाची रक्कम चोरीस गेली असावी असा अंदाज आहे. एटीएम मशीनची कॅश समरी आल्यानंतर नेमकी रक्कम चोरीस गेली या उलगडा होईल. 

एटीएम मशीन फोडण्याची चौथी वेळ 

स्टेट बँकेचे एटीएम मशीन नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर आहे. आता पर्यत चारवेळा हे मशीन फोडण्यात आले आहे. मागील वेळी तर मशीन उचलून चालविले होते. पोलिस गाडीचे सायरन वाजले चोरटे मशीन सोडून पळाले.  हे चोरटे राजस्थानमधील होते. हे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: atm machines of state bank were broken sum of 27 lakh was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.