चितळी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:26 AM2021-09-04T04:26:02+5:302021-09-04T04:26:02+5:30

आरोपींमध्ये आकाश राधू खरात व सागर दत्तू पवार यांचा समावेश आहे. दोघेही गावातील रहिवासी आहेत. आकाश याला औरंगाबाद ...

Atrocities on a minor girl in Chitli | चितळी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

चितळी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आरोपींमध्ये आकाश राधू खरात व सागर दत्तू पवार यांचा समावेश आहे. दोघेही गावातील रहिवासी आहेत. आकाश याला औरंगाबाद येथून तर सागरला वैजापूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुन्ह्यात प्रारंभी अकस्मात, नंतर अत्याचारास प्रवृत्त करणे व त्यानंतर गुरुवारी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आदिवासी समाजातील एका १४ वर्षीय मुलीचा मृतदेह चितळी येथे गळफास घेतलेल्या स्थितीत एका घरात १९ ऑगस्टला आढळून आला होता. मुलीच्या घरापासून काही अंतरावरील आकाश खरात याचे हे घर होते. शवविच्छेदन अहवालानंतर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश राधू खरात या गावातील तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला गेला. आकाश हा मुलीला लग्नाची मागणी घालत होता, असे फिर्यादीत म्हटले होते. श्रीरामपूर पोलिसांनी आकाश याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने गुन्ह्यात सागर याचा समावेश असल्याचेही पोलिसांना सांगितले.

नगर येथील जिल्हा रुग्णालयाने प्रारंभी मुलीच्या गुप्तांगावर जखमा झाल्याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना दिला होता. मात्र पोलिसांनी पुन्हा पत्रव्यवहार करीत स्पष्ट अहवाल देण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर रुग्णालयाने मुलीवर अत्याचार झाल्याचा नव्याने अहवाल सादर केला.

------------

आरोपीने मुलीवर पूर्वीही केला अत्याचार

गुन्ह्यातील आरोपी सागर पवार याने याच मुलीवर काही महिन्यांपूर्वी अत्याचार केला होता. त्या गुन्ह्यामध्ये सागर याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो तीन महिन्यांपासून जामिनावर मुक्त झाला होता.

----------

गुन्ह्यातील दोन्ही आरोपींची डीएनए चाचणीसाठी नमुने नाशिक येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. मुलीचेही नमुने घेण्यात आले आहेत. गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे.

- अतुल बोरसे, पोलीस उपनिरीक्षक, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे.

--------

Web Title: Atrocities on a minor girl in Chitli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.