लातुर जिल्ह्यातील एकाकडुन राहुरीच्या तरुण शिक्षिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 03:33 PM2020-08-27T15:33:59+5:302020-08-27T15:34:49+5:30

राहुरी : राहुरी भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय शिक्षिकेला बदनामी करण्याची धमकी देवून तिच्यावर घरात वेळोवेळी बळजबरीने तिच्या इच्छेविरूद्ध अत्याचारा केल्याची घटना घडली आहे.

Atrocities on a young teacher from Rahuri in Latur district | लातुर जिल्ह्यातील एकाकडुन राहुरीच्या तरुण शिक्षिकेवर अत्याचार

लातुर जिल्ह्यातील एकाकडुन राहुरीच्या तरुण शिक्षिकेवर अत्याचार

राहुरी : राहुरी भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय शिक्षिकेला बदनामी करण्याची धमकी देवून तिच्यावर घरात वेळोवेळी बळजबरीने तिच्या इच्छेविरूद्ध अत्याचारा केल्याची घटना घडली आहे.

 

  

तरुण शिक्षिकेला आरोपी धीरज रामराव नाईकवाडे (रा . अहमदपूर , ता.अहमदपूर , जि.लातूर)  याने वेळोवेळी तुझा भाऊ , तुझी आई , बहीण यांना जीवे ठार मारीन , अशी धमकी देवून तसेच तुझी बदनामी करेन , असे धमकावून अत्याचार केला.

 

 राहुरी परिसरात एका घरात तसेच अहमदापूर येथे राहत्या घरी तसेच पैठण तालुक्यातील भाड्याच्या खोलीत व शिर्डी येथील एका लॉजवर वेळोवेळी बळजबरीने धमकावून अत्याचार्का केला होता. हा प्रकार २०११ ते सप्टेंबर २०१ ९ पर्यंत घडला आहे.

 

या घटनेबाबत  या शिक्षिकेने राहरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आरोपी धीरज रामराव नाईकवाडे याच्या विरोधात भादवी कलम ३७६ , ३८६ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करून आरोपी धीरज रामराव नाईकवाडे याने पिडीत तरूण शिक्षिकेकेडून शिक्षक बँकेचा ७ लाख रूपये रक्कमेचा चेक बळजबरीने घेतला, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

 

 अद्याप आरोपी पसार झाला असुन सहाय्यक पोलीस निरीक्षक  सचिन बागुल हे या घटनेचा तपास करीत आहेत.

 

एका शिक्षिकेला अशाप्रकारे धमकीला घाबरून अत्याचाराला सामोरे जावे लागले. या घटने मुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: Atrocities on a young teacher from Rahuri in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.