श्रीगोंद्यातील भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 03:03 PM2018-06-14T15:03:50+5:302018-06-14T15:04:09+5:30
श्रीगोंदा येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपाअधिक्षक भास्कर सुभाष भांदुर्गे यांच्यावर हल्ला करण्यात आला. नातेवाईकाच्या जमीनीची मोजणी करूा न दिल्याचा राग धरून चिखली येथील गणेश झेंडे याने दांडक्याने भुमी अभिलेख कार्यालयात प्राण घातक हल्ला करण्यात आला. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपाअधिक्षक भास्कर सुभाष भांदुर्गे यांच्यावर हल्ला करण्यात आला. नातेवाईकाच्या जमीनीची मोजणी करूा न दिल्याचा राग धरून चिखली येथील गणेश झेंडे याने दांडक्याने भुमी अभिलेख कार्यालयात प्राण घातक हल्ला करण्यात आला. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
यानिषेधार्थ भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आह.े पोलिसांनी आरोपी गणेश झेंडे याला ताब्यात घेतले आहे.
भास्कर भांदुर्गे हे कार्यालयात काम करीत असताना गणेश झेंडे आला. ‘तु माझ्याा नातेवाईकाच्या जमीनीची मोजणी का करू दिली नाही’ समोरच्या माणसाकडून पैसे घेतो काय? असे म्हणत खो-याचा दांडा काढला. शिवीगाळ दमबाजी केली तसेच मारहाणही केली.