हल्ल्यात चोरटे जखमी

By Admin | Published: February 17, 2016 10:34 PM2016-02-17T22:34:14+5:302016-02-17T22:41:34+5:30

शेवगाव : धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना पाठलाग करून पकडण्यात आले व बेदम चोप देऊन त्यांना शेवगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

In the attack, thieves wounded | हल्ल्यात चोरटे जखमी

हल्ल्यात चोरटे जखमी

शेवगाव : धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना पाठलाग करून पकडण्यात आले व बेदम चोप देऊन त्यांना शेवगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. जमावाने केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या दोन्ही चोरट्यांना नगर येथे हलविण्यात आले आहे. चित्रपटाच्या कथानकास शोभणारी ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास शेवगाव-गेवराई रस्त्यावर घडली.
शेवगाव-गेवराई रस्त्यावरून बाजारपेठेत सामान खरेदीसाठी निघालेल्या दिलशाद मुस्ताफ शेख या महिलेल्या गळ्यातील २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण पल्सर मोटारसायकल गाडीवरून भरधाव चाललेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून गेवराई, पैठण रस्त्याकडे पळ काढला. महिलेने आरडाओरड करताच जवळच असलेल्या तिच्या मोमीन (वय २६) या मुलाने मोटारसायकलवरून चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. एका रुग्णालयाजवळ मोमीनने चोरट्यांच्या गाडीला आपली गाडी आडवी घालून त्यांना खाली पाडले. चोरट्यांशी त्याची झटापट सुरू असताना जमलेल्या जमावाने घटना लक्षात येताच चोरट्यांची यथेच्छ धुलाई केली व पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी या घटनेतील आरोपी सुरेश नामदेव चव्हाण व दगडू दादाराव काळे (दोघे रा. राजापूर, ता. गेवराई, जि.बीड) यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता या चोरट्यांनी काही वेळापूर्वी शहराच्या मुंडे चौकात जयश्री राजेंद्र पितळे या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याची पोतही धूमस्टाईलने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: In the attack, thieves wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.