पोलीस ठाण्याबाहेर अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:23 AM2021-05-20T04:23:18+5:302021-05-20T04:23:18+5:30
संगमनेर : पतीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी एक महिला आली होती. तिच्या पतीने पोलीस ठाण्याबाहेर अंगावर पेट्रोल ओतून घेत ...
संगमनेर : पतीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी एक महिला आली होती. तिच्या पतीने पोलीस ठाण्याबाहेर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी ( दि.१९) दुपारी १२ च्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याबाहेर घडली. पोलिसांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतलेल्या व्यक्तीला पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
गणेश चंद्रभान गायकवाड (वय ३१, रा. खांडगाव, ता. संगमनेर) असे अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल बन्सी येशू टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राजक्ता गणेश गायकवाड ही महिला पती गणेश गायकवाड याच्याविरोधात फिर्याद देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात आली होती. त्यावेळी गणेश हा देखील तेथे आला. पोलीस ठाण्यात त्याने आरडाओरड सुरू केली. ‘मला माझी मुलगी माझ्या ताब्यात दे’ असे तो ओरडत होता. पोलीस त्याला समजावून सांगत होते. मात्र, त्याचे ओरडणे सुरूच होते. त्यानंतर तो तेथून निघून गेला. काही वेळाने तो पुन्हा पोलीस ठाण्यात आला असता त्याच्या हातात एक बाटली होती. त्या बाटलीतील द्रव पदार्थ त्याने अंगावर ओतून घेतले. पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांनी लगेचच त्याच्याकडे धाव घेत त्याला पडकले. त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले होते. पोलिसांनी त्याला पकडल्याने पुढील मोठा अनर्थ टाळला. पोलीस नाईक विजय खाडे अधिक तपास करीत आहेत.