२०२२ पर्यंत ‘निळवंडे’चे पाणी देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:06+5:302021-03-22T04:19:06+5:30
संगमनेर : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच दुसऱ्याच दिवसापासून निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला गती दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात या ...
संगमनेर : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच दुसऱ्याच दिवसापासून निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला गती दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात या कालव्यांसाठी भरीव निधी मंजूर केला. अजूनही निधी उपलब्ध करून देत २०२२ पर्यंत दुष्काळी भागात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
रविवारी (दि.२१) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंत्री थोरात बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा ऑनलाईन झाली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, शिवाजीराव थोरात, इंद्रजीत थोरात, अमित पंडित, शंकरराव खेमनर, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, गणपतराव सांगळे, साहेबराव गडाख, संपतराव डोंगरे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपत गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिक यादव, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, मीरा वरपे, मंदा वाघ, किरण कानवडे, शंकर धमक, नानासाहेब शिंदे, राजेंद्र गुंजाळ, केशव दिघे, राजेंद्र कढणे आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ यांनी केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. उपाध्यक्ष हासे यांनी आभार मानले.
...
१० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप
५ हजार ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या साखर कारखाना व ३० मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प हे निर्णय अत्यंत दूरदृष्टीचे ठरले आहेत. चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र ऊस जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. कारखान्याने यंदाच्या हंगामात आतापर्यंत १० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. कारखान्याची वाटचाल चांगली असून अधिक कार्यक्षमतेने काम करताना हा लौकिक यापुढेही असाच राहील, असा विश्वासही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
...