राहुरीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी एकास पाठलाग करुन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 12:07 PM2019-12-08T12:07:36+5:302019-12-08T12:08:10+5:30
राहुरी बसस्थानकासमोर असलेले एटीएम फोडण्याचा चोरटे प्रयत्न करीत असल्याची पोलिसांना चाहूल लागली. अचानक पोलिसांना पाहताच पाच जणांनी येथून पलयान केले़ पोलिसांनी एका चोरट्याचा एक किलोमीटर पाठलाग करुन त्यास मल्हारवाडी शिवारात पकडून अटक केली.
राहुरी : राहुरी बसस्थानकासमोर असलेले एटीएम फोडण्याचा चोरटे प्रयत्न करीत असल्याची पोलिसांना चाहूल लागली. अचानक पोलिसांना पाहताच पाच जणांनी येथून पलयान केले़ पोलिसांनी एका चोरट्याचा एक किलोमीटर पाठलाग करुन त्यास मल्हारवाडी शिवारात पकडून अटक केली. ही घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
दत्तात्रय बोºहाडे (रा.आरडगाव, ता़राहुरी) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्य आरोपींचा राहुरी पोलीस शोध घेत आहेत. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास राहुरी बसस्थानकासमोर असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये अंधारात आवाज येत असल्याचे फिरतीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आले़ पोलीस उपनिरीक्षक शिरसाट यांनी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मािहती दिली़ त्यानंतर पोलिसांचा सुगावा लागताच सहा जण पळून लागले़ यातील एका दरोडेखोराचा पोलिसांनी एक किलोमिटर पाठलाग केला़ आरोपी दत्तात्रय बोºहाडे यास पकडण्यात पोलिसांना यश आले़ मात्र अन्य पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले़
घटनास्थळी असलेल्या एटीएमलगत लोखंडी कटवणी, लोखंडी टॉमी व मोठे दोन स्क्रू पोलिसांना आढळून आले़ अंधारामुळे पोलिसांना संशय आल्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले़ मागील वर्षी राहुरी खुर्द येथे एटीएम फोडून रक्कम लंपास करण्यात आली होती़ गजबजलेल्या ठिकाणी आरोपींना केलेला प्रयत्न असफल झाला आहे़ यापूर्वी झालेल्या घटनेशी याचा संबंध आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत़ घटनास्थळी श्वानपथक दाखल झाले़ घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिरसाट यांनी भेट दिली़ पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस़ए़बागुल हे करीत आहेत़
राहुरी बसस्थानकासमोर रविवारी पहाटे स्टटे बँकेचे एटीएम फोडीत असताना राहुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे आर्थिक हानी टळली़ यासंदर्भात एकास अटक करण्यात आली आहे. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले़ अन्य आरोपींचा तपास सुरू आहे़, असे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले.