राहुरी तालुक्यातील कोल्हारमधील जिल्हा बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 07:25 PM2018-02-22T19:25:38+5:302018-02-22T19:32:27+5:30

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील शाखा फोडण्याचा प्रयत्न काल रात्री झाला. मात्र मॅसेज अलार्ममुळे तिजोरीत असलेले अडीच लाख रूपये सुरक्षित राहीले

 Attempts to break a safe bank in Kolhar of Rahuri taluka | राहुरी तालुक्यातील कोल्हारमधील जिल्हा बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

राहुरी तालुक्यातील कोल्हारमधील जिल्हा बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देमॅसेज अलार्ममुळे अडीच लाख बचावले

राहुरी : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील शाखा फोडण्याचा प्रयत्न काल रात्री झाला. मात्र मेसेज अलार्ममुळे तिजोरीत असलेले अडीच लाख रूपये सुरक्षित राहीले. कोल्हार येथील बँक फोडण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. तीन चोरटयांनी शाळेच्या बाजुने असलेले तारेचे कुंपन तोडले. त्यानंतर जिल्हा बँकेची खिडकी मागील बाजुने गॅस कटरच्या सहाय्याने ताडली. गज कापल्यानंतर चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. चोरी करण्याचा प्रकारात सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये म्हणून चोरट्यांनी खबरदारी घेतली. सीसीटीव्हीची केबलही तोडली. जिल्हा बँकेची तिजोरी तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी अलार्म मेसेज मॅनेजर संभाजी गागरे यांना गेला. मॅनेजर गागरे यांनी वॉचमन कचरे यांनी माहीती दिली. कचरे यांना तिघे चोरटे दिसले. चोरट्यांना दटवण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी वाचमन कचरे यांचा पाठलग केला. कचरे यांनी नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गाच्या दिशेन धाव घेतली. लोक जमा होतील याचा अंदाज आला. त्यामुळे चोरट्यांनी संगणकाचे राऊटर चोरून नेले़. घटनेची माहीती मिळताच राहुरीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सात महीन्यापुर्वीही जिल्हा बँकेच्या कोल्हार शाखेत चोरीचा प्रयत्न झाला होता.

 

Web Title:  Attempts to break a safe bank in Kolhar of Rahuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.