शेतक-याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; गुंडेगाव येथील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 05:28 PM2019-10-16T17:28:07+5:302019-10-16T17:28:07+5:30

जेवणासाठी घरी बोलाविलेल्या शेतकरी मित्राने आग्रह करूनही मांसाहार न केल्याने दोघांनी त्याला टोकदार वस्तूने बेदम मारहाण करीत अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले़. या घटनेत पीडित शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे १४ आॅक्टोबर रोजी ही घटना घडली़. 

Attempts to burn the farmer alive; Shocking type at Gundegaon | शेतक-याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; गुंडेगाव येथील धक्कादायक प्रकार

शेतक-याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; गुंडेगाव येथील धक्कादायक प्रकार

अहमदनगर : जेवणासाठी घरी बोलाविलेल्या शेतकरी मित्राने आग्रह करूनही मांसाहार न केल्याने दोघांनी त्याला टोकदार वस्तूने बेदम मारहाण करीत अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले़. या घटनेत पीडित शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे १४ आॅक्टोबर रोजी ही घटना घडली़. 
   या घटनेनंतर पीडित संजय पोपट जाधव (वय ४८ व्यवसाय शेती, रा़ गुंडेगाव ता़ नगर) यांनी जिल्हा रुग्णालयातून दिलेल्या जबाबावरून बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर (दोघे रा. ग़ुंडेगाव) यांच्याविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. बापू हराळ हा आर्मीत जवान असून सुट्टीसाठी तो गुंडेगाव येथे आलेला आहे़. कुसळकर हा आर्मीतून निवृत्त आहे़. या दोघांनी १४ आॅक्टोबर रोजी संजय जाधव यांना घरी जेवणासाठी बोलाविले़ जाधव यांना जेवणात मांसाहार खाण्यास दिला. तो खाण्यास जाधव यांनी नकार दिला़. याचा राग येऊन हराळ व कुसळकर यांनी जाधवला गावातील मंगल कार्यालयासमोर नेऊन मारहाण केली़. तसेच त्यांच्या गुदद्वारात टोकदार वस्तू घालून जखमी केले़. त्यानंतर हराळ याने त्याच्याजवळील बाटलीतील पेट्रोल जाधव यांच्या अंगावर टाकून पेटवून दिले़. या घटनेत जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. दरम्यान या घटनेने गुंडगावात खळबळ उडाली आहे़. फिर्याद दाखल झाल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकरसिंग राजपूत, उपनिरीक्षक राऊत यांच्या पथकाने हराळ व कुसळकर यांना अटक केली़. या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे़. याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक अजित पाटील हे पुढील तपास करीत आहेत़. 

Web Title: Attempts to burn the farmer alive; Shocking type at Gundegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.