पारनेर तहसीलदारांवर डिझेल ओतून ठार मारण्याचा वाळू तस्करांचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 06:24 PM2017-12-13T18:24:02+5:302017-12-13T18:24:26+5:30
बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केला. ही घटना बुधवारी दुपारी पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील कुकडी नदीपात्रात घडली.
पारनेर : बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केला. ही घटना बुधवारी दुपारी पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील कुकडी नदीपात्रात घडली.
कुकडी नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार भारती सागरे या पथकासह दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात पोहोचल्या. यावेळी काही वाळू तस्कारांनी सागरे यांच्यावर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पथकातील इतर कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखत सागरे यांना बाजूला ओढले. त्यामुळे पुढील अनर्थातून त्या वाचल्या. घटनेनंतर वाळू तस्करांनी तात्काळ तेथून पळ काढला. पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी घटनेचा पंचनामा केला. सागरे यांच्यावर हल्ला करण्याबरोबरच वाळूतस्करांनी पथकातील काही कर्मचा-यांवर दगडफेक करीत मारहाणही केली.