विकास आराखडा प्रशिक्षणाला अवघ्या १५ सदस्यांची हजेरी

By | Published: December 5, 2020 04:40 AM2020-12-05T04:40:40+5:302020-12-05T04:40:40+5:30

केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करायचा, प्रत्येक गावातील गरजा ओळखून त्यांची प्राधान्यक्रमाने यादी तयार करून ...

Attendance of only 15 members for development plan training | विकास आराखडा प्रशिक्षणाला अवघ्या १५ सदस्यांची हजेरी

विकास आराखडा प्रशिक्षणाला अवघ्या १५ सदस्यांची हजेरी

केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करायचा, प्रत्येक गावातील गरजा ओळखून त्यांची प्राधान्यक्रमाने यादी तयार करून विकास आराखडा कसा करावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे शुक्रवारी सदस्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, काशीनाथ दाते, उमेश परहर, मीराताई शेटे यांच्यासह ९ सदस्यांनी हजेरी लावली. ज्या प्रशिक्षणात गावांचा विकास आराखडा आखला जाणार होता त्याच्याच प्रशिक्षणात सदस्यांना का रस नाही किंवा ते का आले नाहीत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, प्रशिक्षण शिबिरात आमचा गाव, आमचा विकास योजनेत विकास आराखडे तयार करताना गावातील गरजांनुसार प्राधान्य यादी तयार करावी, १५ वित्त आयोगाचा ८० टक्के निधी हा ग्रामपंचायत पातळीवर वर्ग करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्या गावातील गटांची गरजेनुसार प्राधान्यक्रम यादी तयार करून त्यानुसार आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Web Title: Attendance of only 15 members for development plan training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.