नगरच्या नेप्ती बाजार समितीत भाजीपाला, फळांचे लिलाव सुरू; राज्यातील प्रमुख बाजारपेठात माल पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 01:42 PM2020-05-29T13:42:29+5:302020-05-29T13:43:43+5:30
अहमदनगर : येथील दादा पाटील शेळके नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात शुक्रवारपासून भाजीपाला आणि फळांचे लिलाव शेतकरी व खरेदीदार यांच्या आग्रहास्तव रोज संध्याकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत सुरू राहतील. दररोज सकाळी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत सुध्दा भाजीपाला व फळे विक्री नेप्ती उपबाजार येथे सुरू राहील. असा निर्णय सभापती अभिलाष घिगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आहे.

रोज सायंकाळी होणा-या भाजीपाला व फळांच्या लिलावामुळे राज्यातील इतर प्रमुख बाजारपेठात म्हणजेच पुणे, मुंबई, कल्याण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या ठिकाणी नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथून शेतमाल जास्तीत जास्त पाठवता येईल. यामुळे शेतक-यांच्या मालाला सुध्दा बाजारभाव जास्त मिळेल. तसेच शेतक-यांना बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त शेतीमाल विक्रीस आणता येईल. त्याबरोबर वाहतूक खर्चातही बचत होईल, असा विश्वास यावेळी सभापती घिगे यांनी व्यक्त केला.
यावेळी समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, संचालक सर्वश्री हरिभाऊ कर्डिले, रेवणनाथ चोभे, संतोष कुलट, दिलीप भालसिंग, वसंत सोनवणे, बाबासाहेब जाधव, शिवाजी कार्ले, बाळासाहेब निमसे, बन्सी कराळे, बाबासाहेब खर्से, बबन आव्हाड, सचिव अभय भिसे आदी उपस्थित होते.
तरी सर्व शेतक-यांनी व खरेदीदारांनी याची नोंद घ्यावी. जास्तीत जास्त शेतमाल शेतक-यांनी नेप्ती उपबाजार येथे विक्रीसाठी आणावा, तसेच जास्तीत जास्त खरेदीदारांनी सायंकाळी होणा-या लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन बाजार समितीमार्फत करण्यात आले आहे.