अगस्तीने केले ६ लाख ११ हजार टनांचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:15 AM2021-04-29T04:15:54+5:302021-04-29T04:15:54+5:30

अगस्ती सहकारी साखर कारखान्याने ६ लाख ५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून २०२०-२१ या गळीत हंगामासाठी ठरवलेले उद्दिष्ट ...

August has sifted 6 lakh 11 thousand tons | अगस्तीने केले ६ लाख ११ हजार टनांचे गाळप

अगस्तीने केले ६ लाख ११ हजार टनांचे गाळप

अगस्ती सहकारी साखर कारखान्याने ६ लाख ५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून २०२०-२१ या गळीत हंगामासाठी ठरवलेले उद्दिष्ट मंगळवारी (२७ एप्रिल) पूर्ण केल्याने ऊस उत्पादक सभासद चालू गळीत हंगामातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत आहेत. अगस्तीने आतापर्यंत ६ लाख ५६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. अगस्तीचा आजचा साखर उतारा १२.६० टक्के असून सरासरी १०.८६ टक्के आहे. अजूनही कार्यक्षेत्रातून गळितास साधारणपणे ३५ हजार मेट्रिक टन ऊस येणे अपेक्षित आहे.

चालू गळीत हंगामाचा बुधवारी १८६ वा दिवस आहे. अगस्तीची प्रतिदिन ऊस गाळपाची क्षमता २५०० मेट्रिक टन असून देखील अगस्तीने मागील गळीत हंगामापासून आहे. त्याच यंत्रणेत अत्याधुनिक बदल केला आहे. प्रतिदिन ३६०० ते ३८०० मेट्रिक टन क्षमतेने मिल चालवण्याचे कसब यशस्वी केले आहे.

चालू गळीत हंगामापासून ३० हजार लिटर्स प्रतिदिन क्षमतेने इथेनॉल निर्मिती करीत प्रकल्पाची चाचणी यशस्वी केली आहे. हा गळीत हंगाम थांबवण्यात अगस्तीच्या प्रशासनाकडून ३० एप्रिलची अंतिम तारीख निश्चित केली आहे. तरीदेखील अगस्तीचा पट्टा साधारणपणे ५ मेनंतरच पडेल.

उपाध्यक्ष सीताराम गायकर म्हणाले, कार्यक्षेत्रातून गळितास असलेल्या संपूर्ण उसाची तोड झाल्यानंतरच बाॅयलर थंड होईल. चालू गळीत हंगामात अगस्तीच्या कार्यक्षेत्रात प्रवरा, मुळा व आढळा खोऱ्यातून व आदिवासी भागातूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ऊस लागवडीखालील क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. पुढील गळीत हंगामात गाळपासाठी सुमारे ६ लाख मेट्रिक टन ऊस कार्यक्षेत्रातून निर्माण करण्यात आला आहे. शिवाय, कार्यक्षेत्राबाहेरूनही ऊस पुरविण्यात राहुरी, नेवासे, निफाड, गंगापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आग्रही आहेत. चालू गळीत हंगामातही कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अगस्तीवरील विश्वास कायम ठेवून ऊस पुरविण्यात सहकार्य केल्यामुळेच हंगाम यशस्वी करू शकलो. या हंगामापासून पूर्ण क्षमतेनुसार इथेनॉल प्रकल्प चालवून इथेनॉल निर्मिती केली. त्याचा फायदा ऊस उत्पादक सभासदांना अधिकचा ऊसदर मिळण्यावर होणार आहे.

.............

कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह अधिकारी, खातेप्रमुख, साखर कामगार, ऊस उत्पादक, सभासद, ऊसतोड ठेकेदार व कामगार, वाहतूकदार यांनी एकत्रितपणे नियोजनबद्ध प्रोग्राम उत्तम पद्धतीने राबविल्याने गळीत हंगामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, तो अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी दिली.

Web Title: August has sifted 6 lakh 11 thousand tons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.