ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक- मालक संघटनेच्यावतीने साखळी पद्धतीने बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 01:28 PM2020-06-29T13:28:42+5:302020-06-29T13:30:41+5:30

अहमदनगर :  कोविड  महामारीमुळे रिक्षाचालक_ मालक यांना वीस हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करावी. तसेच महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी या मागणीकडे नगर शहरात रिक्षा चालकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Auto Rickshaw and Taxi Drivers-Owners Association | ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक- मालक संघटनेच्यावतीने साखळी पद्धतीने बेमुदत उपोषण सुरू

ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक- मालक संघटनेच्यावतीने साखळी पद्धतीने बेमुदत उपोषण सुरू

अहमदनगर :  कोविड  महामारीमुळे रिक्षाचालक_ मालक यांना वीस हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करावी. तसेच महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी या मागणीकडे नगर शहरात रिक्षा चालकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने मार्केटयार्ड हमाल भवन येथे साखळी पद्धतीने सोशल डिस्टंसिंग ठेवून कायदेशीर नियमाचे पालन करून बेमुदत उपोषण चालू करण्यात आले. 

 यावेळी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, सचिव अशोक औशिकर, सल्लागार विलास कराळे, रावसाहेब काळे, गोरख खांदवे, रघुनाथ कापरे, प्रकाश गोसावी, सुनिल खेर्पे, लतीफ शेख, नंदकुमार गायकवाड, शंकर जाधव, गोरख रोहकले, विषाल कावडे, रवींद्र वाघ, दीपक गहिले आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  

 

लॉकडाउन झाल्यामुळेऑटो रिक्षा चालकांचे व्यवसाय बंद आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहेत.  रिक्षाचालकांवर आजपर्यंत इतके दिवस रिक्षा बंद ठेवण्याची वेळ आली नव्हती.  तरी शासनाने रिक्षाचालकांसाठी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही,  रिक्षा चालक व मालक सरकारला वाहन कर इन्शुरन्स पासिंग इतर कर आणि डिझेल व पेट्रोल खरेदी कर भरत असतो वर्षाला सर्व मिळून एक रिक्षा चालक 30 हजार रुपये सरकारला महसूल भरत आहेत.  पण सरकार रिक्षाचालक व मालकांना मदत करण्याबाबत विचार करायला तयार नाही.  रिक्षाचालक हर रोज कमावणारा व खाणारा समाजाचा घटक आहे महाराष्ट्र मध्ये ऑटोरिक्षा धारक परवानाधारक 25. लाख आहे.

 चालक-मालक मिळून 50 लाख इतकी आहे तर राज्याप्रमाणे केरळ दिल्ली कर्नाटक या राज्यात 10 हजार रुपये सरकारने रिक्षा चालक व मालक यांना आर्थिक मदत दिलेली असून त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त मदत रिक्षा चालक व मालक यांना तातडीने 20 हजार रुपये आर्थिक मदत मिळावी म्हणून अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने मार्केट याड हमाल भवन येथे साखळी पद्धतीने उपोषण चालू करण्यात आले आहे.

Web Title: Auto Rickshaw and Taxi Drivers-Owners Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.