श्रीगोंद्यात राष्ट्रपुरुषांच्या विचाराचा जागर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:20 AM2021-02-14T04:20:24+5:302021-02-14T04:20:24+5:30
श्रीगोंदा : शिवजयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रपुरुष विचार सप्ताहास श्रीगोंदा शहरात सुरुवात झाली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन संभाजी ...
श्रीगोंदा : शिवजयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रपुरुष विचार सप्ताहास श्रीगोंदा शहरात सुरुवात झाली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रफीक सय्यद होते.
गौतम बुद्ध, भगवान महावीर, संत कबीर, संत रोहिदास, संत तुकाराम, सुफी संत शेख महंमद महाराज ते संत गाडगेबाबा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अण्णा भाऊ साठे या महापुरुषांमुळे महाराष्ट्रातील माणूस घडला आहे, असे विचार ज्येष्ठ विचारवंत आर. एस. यादव यांनी व्यक्त केले.
सर्व बहुजनांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन प्रवीण गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक ॲड. संभाजी बोरूडे यांनी केले. यावेळी मनोहर पोटे, घनश्याम शेलार, बाळासाहेब शेलार, नगरसेवक संतोष खेतमाळीस, संतोष क्षीरसागर, सतीश मखरे, ‘प्रहार’चे वामन भदे, साहेबराव रासकर, बापूराव माने, मच्छिंद्र सुपेकर, प्रदीप खामगळ, आदेश शेंडगे, अमोल म्हस्के, राजेंद्र औटी, संभाजी ब्रिगेडचे नानासाहेब शिंदे, मुकुंद सोनटक्के, विनोद उजागरे आदी उपस्थित होते. स्वागत अरविंद कापसे यांनी केले. संतोष इथापे यांनी आभार मानले.