संजीवनी ‘टाँडलर्स’ला पुरस्कार
By | Published: December 8, 2020 04:17 AM2020-12-08T04:17:32+5:302020-12-08T04:17:32+5:30
कोपरगाव : राष्ट्रीय पातळीवरील बिझिनेस वर्ल्ड एज्युकेशन या संस्थेने ‘टाप एज्युकेशन ब्रॅन्डस् २०२०’ अंतर्गत स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पर्धेत ...
कोपरगाव : राष्ट्रीय पातळीवरील बिझिनेस वर्ल्ड एज्युकेशन या संस्थेने ‘टाप एज्युकेशन ब्रॅन्डस् २०२०’ अंतर्गत स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पर्धेत संजीवनी अकॅडमी संचलित संजीवनी टाँडलर्सला ‘इनोव्हेशनस फाॅर करीक्युलम फार प्री स्कूल’ या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविले आहे, अशी माहिती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका मनाली कोल्हे यांनी दिली.
कोल्हे म्हणाल्या, बिझिनेस वर्ल्ड एज्युकेशन या संस्थेच्या परिपत्रकानुसार संजीवनी टाँडलर्सने ३ ते ५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोविड-१९ च्या विश्वव्यापक महामारीत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आलेल्या क्लस्टर टिचिंग, कौशल्य विकास, नैतिकमूल्ये, कृतियुक्त अध्ययनपध्दती, विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन, इत्यादी उपक्रमांचे पावरपाॅईंट सादरीकरण पाठविले होते. याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या इतरही उपक्रमांची माहिती व त्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठीचे पुरावे पाठविले होते. बिझिनेस वर्ल्ड एज्युकेशन या संस्थेने या सर्व बाबींची सत्यता व वास्तव स्वीकारून संजीवनी टाँडलर्सला अंतिम फेरीत प्रवेश दिला. अंतिम फेरीत ६ परीक्षकांनी व्हर्चअल मिटींगद्वारे विविध प्रश्न विचारले. आणि या सर्व कसोट्यांमध्ये देशातील इतर १४० संस्थांमधून संजीवनी टाँडलर्स अव्वल ठरले व प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले, असेही कोल्हे यांनी म्हटले आहे. या यशाबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी संचालिका मनाली कोल्हे, प्राचार्या सुंदरी सुब्रह्मण्यम आदींचे कौतुक केले.
................
फोटो07- मनाली कोल्हे, कोपरगाव