श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला पुरस्कार हे सर्वांच्या परिश्रमाचे फळ- डॉ. वसंत जमधडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 12:12 PM2020-10-22T12:12:24+5:302020-10-22T12:13:02+5:30

श्रीरामपूर : लोकप्रतिनिधी, जनता, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपूर्वक परिश्रम व मानसिक परिवर्तन यामुळे मिळाला आहे, अशी भावना  ग्रामीण रुग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

The award to Shrirampur Rural Hospital is the fruit of everyone's hard work - Dr. In the spring | श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला पुरस्कार हे सर्वांच्या परिश्रमाचे फळ- डॉ. वसंत जमधडे

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला पुरस्कार हे सर्वांच्या परिश्रमाचे फळ- डॉ. वसंत जमधडे

श्रीरामपूर : लोकप्रतिनिधी, जनता, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपूर्वक परिश्रम व मानसिक परिवर्तन यामुळे मिळाला आहे, अशी भावना  ग्रामीण रुग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.


श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला सलग तिसºया वर्षी कायाकल्प पुरस्कार मिळाला. याबाबत लोकमतने या पुरस्कारामागे नेमके काय परिश्रम आहेत, हे डॉ. जमधडे यांच्याकडून जाणून घेतले.

काय आहे हा पुरस्कार 
श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सलग तिसºया वर्षी प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार पटकावल्याने रुग्णालयाच्या उत्कृष्ट सेवेवर आता सरकारी मोहोर उमटली आहे. रुग्णालयाला १५ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असा पुरस्कार लवकरच प्रदान केला जाणार आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पथदर्शी प्रकल्प तयार करण्यात आला होता. त्या अंतर्गत ग्रामीण व प्राथमिक रुग्णालयात दर्जेदार वैैद्यकीय सुविधा देणाºयांना गौरवान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कायाकल्प पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. 

सलग तिसरा पुरस्कार 
येथील ग्रामीण रुग्णालयाने मागील दोन्ही वर्षी पहिला क्रमांक पटकावला होता. मात्र यावेळेस त्यांना शंभर पैैकी शंभर गुण प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी ९९.८८ गुण मिळाले होते. पुरस्कारासाठी स्वमूल्यांकन, विभागीय व राज्यस्तरीय मूल्यांकन केले जाते. राज्यस्तरीय पथक प्रत्यक्ष रुग्णालयात येऊन पाहणी करते. जंतुसंसर्ग, जैैविक व घनकचरा व्यवस्थापन, तसेच जनतेचा सहभाग या बाबी तपासल्या जातात. रुग्णालयातील अंतर्गत व बा' रुग्ण विभाग, वातानुकूलित शस्त्रक्रिया विभाग, सुसज्ज प्रयोगशाळा या बाबीदेखील निर्णायक ठरल्या. 

रुग्णांची मने जिकंली
सरकारी नाममात्र शुल्कामध्ये दर्जेदार वैैद्यकीय सेवा तसेच मित्रत्वाची नाती जपणारे वैैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णांची मने जिंकली आहेत. त्यामुळे रुग्णालयात दररोज येणाºया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे, असे यशाचे श्रेय जमधडे यांनी टीमला दिले.

Web Title: The award to Shrirampur Rural Hospital is the fruit of everyone's hard work - Dr. In the spring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.