ग्राहक कायद्यांवर जनजागृती गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:20 AM2020-12-31T04:20:54+5:302020-12-31T04:20:54+5:30
अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात ग्राहक पंचायतच्या वतीने ३४ वा राष्ट्रीय ग्राहक दिन नुकताच पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून मुरकुटे ...
अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात ग्राहक पंचायतच्या वतीने ३४ वा राष्ट्रीय ग्राहक दिन नुकताच पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून मुरकुटे बोलत होते. ग्राहक पंचायतीच्या नाशिक विभागाचे उपाध्यक्ष रणजीत श्रीगोड, अशोकचे संचालक सोपान राऊत, तालुका ग्राहक पंचायतचे योगीराज चंद्रात्रे, दत्तात्रय काशिद, अनिता आहेर, शिक्षण संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे, काशिनाथ गोराणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोरख बारहाते, उपप्राचार्य प्रा.सुनिता गायकवाड आदी उपस्थित होते.
मुरकुटे म्हणाले, ग्राहक या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. ग्राहकांचा जेथे संबंध येतो तेथे संरक्षण कायदा लागू होतो. आजकाल भेसळीचे आणि फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. ग्राहक अद्याप कायद्याबाबत तसेच हक्काबाबत सजग नाही. त्यामुळे चळवळ उभी केली पाहिजे.
रणजीत श्रीगोड यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा इतिहास सविस्तरपणे विषद केला. ग्राहक आयोग, ग्राहक मंच या प्राधिकरणाची माहिती दिली. प्रास्तविक प्राचार्य डॉ. बारहाते यांनी केले. उपप्राचार्य प्रा.गायकवाड यांनी स्वागत केले. डॉ.संदीप सांगळे यांनी आभार मानले.
---------