कुऱ्हाडे यांची मानद वन्यजीव रक्षकपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:40+5:302021-05-16T04:19:40+5:30
केडगाव : महसूल व वन विभागाकडून अहमदनगर येथील मारुतराव घुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांची जिल्हा ‘मानद वन्यजीव ...
केडगाव : महसूल व वन विभागाकडून अहमदनगर येथील मारुतराव घुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांची जिल्हा ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्राचार्य कुऱ्हाडे हे ज्येष्ठ पक्षीमित्र असून निसर्ग मित्र मंडळ या पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या संस्थेचे संस्थापक आहेत. जिल्ह्यातील पक्ष्यांची सूची त्यांनी तयार केलेली असून त्यांची पर्यावरण, पक्षी विषयक अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. ते जळगाव येथे झालेल्या राज्य पक्षीमित्र संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी जिल्ह्यातील जनतेला सहभागी करून अहमदनगर शहराचा पक्षी (सिटीबर्ड) ही निवडणूक घेतली होती. त्यामध्ये छोटा निळा धिवर याची निवड करण्यात आली. प्राचार्य कुऱ्हाडे यांनी निसर्ग विषयक ५ पुस्तकांचे लेखन व तीन काव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत.