ऐकावे ते नवलच : आता पीआय ओमासे साहेबांची वर्दी गेली चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:40 PM2018-08-13T15:40:52+5:302018-08-13T15:40:57+5:30
शेवगावचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना ६ लाख रुपयांना फसविल्याची फिर्याद रविवारी दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची सरकारी खाकी वर्दी व बूट चोरीस गेल्याची फिर्याद दाखल झाली आहे.
शेवगाव : शेवगावचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना ६ लाख रुपयांना फसविल्याची फिर्याद रविवारी दाखल झाल्यानंतर दुसºया दिवशी त्यांची सरकारी खाकी वर्दी व बूट चोरीस गेल्याची फिर्याद दाखल झाली आहे. या प्रकारामुळे ओमासे नव्याच वादात सापडले आहेत.
ओमासे यांनीच याबाबतची फिर्याद शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे व त्यांच्या अज्ञात साथीदाराने संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांचा हुबेहुब आवाज काढून आपली सुमारे सव्वासहा लाख रूपयांची फसवून केल्याची फिर्याद ओमासे यांनी रविवारीच दाखल केली आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी आपली वर्दी (खाकी ड्रेस) व बूट विद्यानगर परिसरातील राहत्या घरातून शनिवार ११ आॅगस्टला पहाटेच्या सुमारास साडेसहा वाजेपूर्वी चोरीस गेल्याचे त्यांनी रविवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार संजय मातोडकर अधिक तपास करीत आहेत.