कोतूळमध्ये आयुर्वेदचे अनोखे ‘औषधालय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 11:17 AM2019-09-08T11:17:24+5:302019-09-08T11:17:24+5:30

कोतूळ-ब्राम्हणवाडा रस्त्यावर विलासनगर या ठाकर वस्तीत यशवंत सुखदेव डोके या अवलियाने चक्क खडकावर पन्नासच्यावर अतिदुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करून आयुर्वेदाचे अनोखे ‘औषधालय’ उभारले आहे. 

Ayurveda's unique 'dispensary' in Kotol | कोतूळमध्ये आयुर्वेदचे अनोखे ‘औषधालय’

कोतूळमध्ये आयुर्वेदचे अनोखे ‘औषधालय’

मच्छिंद्र देशमुख 
कोतूळ : ब्राम्हणवाडा रस्त्यावर विलासनगर या ठाकर वस्तीत यशवंत सुखदेव डोके या अवलियाने चक्क खडकावर पन्नासच्यावर अतिदुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करून आयुर्वेदाचे अनोखे ‘औषधालय’ उभारले आहे. 
 यशवंत सुखदेव डोके यांचे कोतूळ- ब्राम्हणवाडा रस्त्यावर छोटेसे टुमदार घर. या रस्त्याने जाणारा वाटसरू इथे थांबतोच. तो भर उन्हाळ्यात हिरवेगार अंगण पाहून! डोके यांच्या कौलारू घरालगत चार गुंठे खडकाळ जमीन आहे. यावर त्यांनी पंधरा वर्षे थोडी थोडी माती टाकून जंगलातील अतिदुर्मिळ वनस्पतींचे रोपण केले. काही अकोले तालुक्यातील जंगलातून तर काही इतर जिल्ह्यातूनही जमा केल्या. त्यासाठी त्यांना पंधरा वर्षे हे काम करावे लागले. उन्हाळात प्यायलाही गावात पाणी नसते. याच गावात अकोले तालुक्यातील पहिला टँकर सुरू होतो. उन्हाळ्यात ही बाग टिकण्यासाठी त्यांनी खडकात दहा फूट खोल व वीस फूट लांब-रूंदीचे शेततळे खोदले. त्यात प्लास्टिक कागद टाकून पाणी साठवले. उन्हाळ्यात दररोज दहा मिनिटे बोअरवेल हजार लिटर पाणी देतो. त्यातून घर वापर व वनस्पती बाग जगवतात.
   यशवंत डोके हे ठाकर समाजाचे असल्याने जंगलातील प्रत्येक वनस्पती व तिचे अनेक पिढ्यांकडून आलेले  गुणधर्म  त्यांना माहीत आहेत. विलासनगर हे  आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत सर्वदूर परिचित आहे.   साप, विंचू, कुत्रा चावल्यास तसेच शरीरात, काटा, काच, लोखंड गेल्यास, मोठी जखम, त्वचारोगावर विविध औषधे आलेल्या रूग्णांना देतात. 
या झाडांचे केले रोपण
काळी गुंज, नाग दवणा, नागवेल, समुद्रसेफ, मालती, शुगर (परदेशी वनस्पती) कळलावी, रघतरोडा, बडदा, बेहडा, रोही, सोनचाफा, रोहितका, निरगुडी, काटेसावर, कोरफड, मोळ, पांढरा जास्वंद, रायआवळा,गेळ, रान वांगी, रान तुळस, काळा धोतरा,  आडुळसा अशा अनेक वनस्पती त्यांच्या बागेत आहेत. तर खजूर, पपई, केळी, फणस, वैशिष्ट्यपूर्ण आंबे व विविध प्रकारच्या वेलवर्गीय,तसेच फुल झाडेही रेलचेल आहेत. 

Web Title: Ayurveda's unique 'dispensary' in Kotol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.