बबन महाराजांच्या मातेने वारकरी सांप्रदायाला रत्न दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:36 AM2021-02-18T04:36:26+5:302021-02-18T04:36:26+5:30
वाळकी : स्वर्गाला जाण्यासाठी पुण्य कर्म लागते. आपण पाप-पुण्याचा हिशोब करीत नसलो तरी त्याचा न्याय निवाडा देवादारी होत असतो. ...
वाळकी : स्वर्गाला जाण्यासाठी पुण्य कर्म लागते. आपण पाप-पुण्याचा हिशोब करीत नसलो तरी त्याचा न्याय निवाडा देवादारी होत असतो. बबन महाराजांच्या मातेला चांगला मार्ग मिळणार आहे. कारण या मातेने वारकरी सांप्रदायाला रत्न दिले आहे, असे प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.
कडा (ता. आष्टी) येथील ग्रामदैवत गुरूवर्य मदन महाराज संस्थानचे मठाधिपती बबन महाराज यांच्या मातोश्री स्व. आसराबाई बारीकराव बहिरवाल यांच्या बेलखंडी (ता.पाटोदा) येथे आयोजित तेराव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
इंदुरीकर म्हणाले, बबन महाराज व त्यांचा परिवार वारकरी झाला हिच धन्यता. कारण जीवनात आईवडिलांकडून आपल्यावर झालेले संस्कार महत्त्वाचे असतात. संस्कार हेच माणसाच्या जगण्याला बळ देतात. सध्या समाजामध्ये अल्पबुद्धी माणसं स्वत:ला विद्वान समजतात. हाच समाजाला लागलेला कलंक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बोडखे महाराज, राम महाराज डोंगर, संतोष महाराज, आमटे महाराज, अनिकेत महाराज, भक्तिदास महाराज, गोरख महाराज, दादा महाराज, माजी आमदार जनार्दन तुपे, संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, विलास बडगे, वनवे, बबन माने, हनुमंत बिहाणी, अण्णासाहेब चौधरी, विजय गोल्हार, संजय ढोबळे, सुभाष घावटे, राजेंद्र जैन आदी उपस्थित होते. बबन महाराज यांनी आभार मानले.