नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बबनराव डोंगरे; जेऊरमध्ये राजश्री मगर, वाळवणेत पती-पत्नी सरपंच, उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 02:09 PM2021-02-09T14:09:41+5:302021-02-09T14:19:42+5:30

नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. बबनराव डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. भेंडा ग्रामपंचायतीत वैशाली शिंदे या सरपंच झाल्या आहेत. तर जेऊरमध्ये राजश्री मगर, वाळवणेत जयश्री पठारे, खारेकरजुनेत अंकुश शेळके, हंगा येथे बाळू दळवी यांची सरपंचपदी निवड झाली आहे. वाळवणेत पती-पत्नी सरपंच उपसरपंच झाले आहेत.

Babanrao Dongre as Sarpanch of Navnagapur Gram Panchayat; Rajshri Magar in Jeur, husband and wife Sarpanch Deputy Sarpanch | नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बबनराव डोंगरे; जेऊरमध्ये राजश्री मगर, वाळवणेत पती-पत्नी सरपंच, उपसरपंच

नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बबनराव डोंगरे; जेऊरमध्ये राजश्री मगर, वाळवणेत पती-पत्नी सरपंच, उपसरपंच

अहमदनगर : शहरानजीक असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. बबनराव डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. भेंडा ग्रामपंचायतीत वैशाली शिंदे या सरपंच झाल्या आहेत. तर जेऊरमध्ये राजश्री मगर, वाळवणेत जयश्री पठारे, खारेकरजुनेत अंकुश शेळके, हंगा येथे बाळू दळवी यांची सरपंचपदी निवड झाली आहे. वाळवणेत पती-पत्नी सरपंच उपसरपंच झाले आहेत.

नवनागापूर ग्रामपंचायतीत  उपसरपंपची संगीता सप्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. वाळवणेत जयश्री पठारे सरपंच, सचिन पठारे उपसरपंचपदी बिनविरोध आले आहेत.  सारोळा अडवाई येथे सरपंचपदी परशुराम फड तर उपसरपंचपदी कोमल महांडुळे यांची निवड झाली आहे. रांजणगाव मशिदच्या सरपंचपदी प्रीतीताई साबळे तर उपसरपंचपदी बाबासाहेब जवक, खारे करजुनेत प्रभाकर मगर उपसरपंचपदी निवडून आले आहेत. 

आमदार निलेश लंके यांच्या हंगा ग्रामपंचायतीत बाळू दळवी सरपंचपदी तर वनिता शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. भोयरे गांगरडा येथे मोहन पवार यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. 

Web Title: Babanrao Dongre as Sarpanch of Navnagapur Gram Panchayat; Rajshri Magar in Jeur, husband and wife Sarpanch Deputy Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.