अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 18:05 IST2019-09-28T16:39:05+5:302019-09-28T18:05:14+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी शिवारातील खटपटनाका परिसरात शुक्रवारी पहाटे घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू
संगमनेर : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी शिवारातील खटपटनाका परिसरात शुक्रवारी पहाटे घडली.
शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांना बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. सुकेवाडीचे माजी सरपंच सुभाष कुटे यांनी वनक्षेत्रपाल वाय. एस. डोंगरे यांना दुरध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती दिली. वनक्षेत्रपाल एस. एस.माळी, वनपाल पी.जे.पुंडे, एस.एम.पारधी, वाय.आर. डोंगरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. बिबट्या नर जातीचा असून अज्ञात वाहनाच्या धडकेने तोंडाला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून त्याचा मृत्यू झाला.