बाळ बोठेला लवकरच गजाआड करणार; पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही; जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:53 PM2021-01-20T16:53:37+5:302021-01-20T16:54:10+5:30
यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणी फरार असलेल्या बाळ बोठे याला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी व्यक्त केला. या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव नसून निष्पक्षरित्या तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीरामपूर : यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणी फरार असलेल्या बाळ बोठे याला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी व्यक्त केला. या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव नसून निष्पक्षरित्या तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवारी शहर पोलीस एका गुन्ह्याच्या तपासानिमित्त आले असता आयोजित पत्रकार परिषेदत मनोज पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपाधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक आयुष नोपाणी उपस्थित होते.
रेखा जरे खून प्रकरणात बोठे हा पोलिसांना सापडत नाही. पोलीस प्रशासनात असलेल्या संबंधामुळे त्याला लाभ होतो आहे का? असा प्रश्न उपस्थित केला असता मनोज पाटील यांनी पोलिसांकडे बोठेविरोधात भक्कम असे पुरावे आहेत. त्याला निश्चितच अटक होईल असे स्पष्ट केले.