राहुरीतील विकासाचा अनुशेष भरून काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:26 AM2021-09-17T04:26:13+5:302021-09-17T04:26:13+5:30
बोधेगाव येथील विकास कामांचा उद्घाटनप्रसंगी आमदार कानडे बोलत होते. काँग्रेस बळकटीकरण अंतर्गत गाव तिथे काँग्रेस मोहिमेचा यावेळी प्रारंभ करण्यात ...
बोधेगाव येथील विकास कामांचा उद्घाटनप्रसंगी आमदार कानडे बोलत होते. काँग्रेस बळकटीकरण अंतर्गत गाव तिथे काँग्रेस मोहिमेचा यावेळी प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, सरपंच संध्या पवार, सतीश बोर्डे, भास्कर लिपटे, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब कांदळकर, रमेश आढाव, तंटामुक्ती अध्यक्ष गोरक्षनाथ बेंद्रे उपस्थित होते.
कानडे म्हणाले, राहुरी तालुक्यातील ३२ गावांतील जनतेने मला भरभरून मतदान केले. त्यामुळे विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. जनतेचे ऋण फेडणे हे लोकसेवक या नात्याने माझे कर्तव्य आहे. गोरगरीब, आदिवासी, मागासवर्गीय, सर्वसामान्य जनतेचा मी प्रतिनिधी आहे. माझ्या आमदारकीच्या काळात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील भूमिहीन व बेघरांना न्याय मिळवून देऊन तालुक्यात कुणीही बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील.
यावेळी मच्छिंद्रनाथ बोठे, ॲड. कैलास लाहोर, सूर्यकांत शिंदे, सुनील शिंदे, राजेंद्र भांड, किशोर शिंदे, अर्जुन भांड, दिलीप माळी, कानिफ बर्डे, रामेशवर नरसाळे, धनंजय बोठे, पंढरीनाथ भांड, साखरबाई माळी, केशव काळे, संजय पाटील उपस्थित होते.
---------
फोटो ओळी : कानडे
राहुरी तालुक्यातील बोधेगाव येथे विकास कामांचे उद्घाटन करताना आमदार लहू कानडे.
------