बहुजन समाजाने आपापले मतभेद दूर ठेवावेत -आ. ह. साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:49 PM2019-01-22T12:49:31+5:302019-01-22T12:49:41+5:30
महात्मा गौतम बुद्धांचाच मार्ग देशात शांतता आणि समता प्रस्थापित करू शकतो.
संगमनेर : महात्मा गौतम बुद्धांचाच मार्ग देशात शांतता आणि समता प्रस्थापित करू शकतो. गुलामगिरीतून मुक्त व्हायचे असेल तर बहुजन समाजाने आपापले किरकोळ मतभेद दूर ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
संगमनेरात छात्रभारती संघटनेच्या ३६ व्या दोन दिवसीय महाराष्टÑ राज्य अधिवेशनात दुसऱ्या दिवशी रविवारी साळुंके बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, राष्टÑ सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अॅड. गोपीनाथ घुले, छात्रभारतीचे प्रदेशाध्यक्ष दत्ता ढगे, प्रा.उल्हास पाटील, प्रा.अर्जुन जाधव, कीर्ती इटकर आदी उपस्थित होते. छात्रभारती संघटनेच्या वतीने दिल्या जाणाºया पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. डॉ. अरूण लिमये पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते तथा लेक लाडकी अभियानाचे जिल्हा समन्वयक गणेश बोºहाडे तर छात्रभारती संघटनेचे पहिले अध्यक्ष प्रा. डॉ. मु. ब. शहा यांच्या नावाने या वर्षीपासून दिला जाणारा कार्यकर्ता पुरस्कार सेवादलाचे कार्यकर्ते शिवराज सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. डॉ. साळुंखे म्हणाले, भूतकाळामध्ये बहुजनांकडून झालेल्या चुका आणि त्यामुळे त्यांच्यावर झालेला अन्याय पुन्हा होऊ नये म्हणून इतिहास नीट समजून घेतला पाहिजे. खोटा लिहिलेला इतिहास काही काळच टिकतो. पुराव्यांच्या आधाराने इतिहास सिद्ध केला गेला पाहिजे. ज्यांनी खोटा इतिहास लिहिला त्यांची मूल्ये अंधाराची होती. आपल्याला प्रकाशाची मूल्ये पुढे घेऊन जायचे आहेत. शांततेच्या मार्गाने माणसे बदलतात. आपल्या जवळील कमीत कमी दोन व्यक्तींना तरी आपण शांततेच्या मार्गाने घेऊन जावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
या अधिवेशनासाठी राज्यभरातून छात्रभारतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पुरोगामी संस्था, संघटनेचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. अधिवेशन यशस्वीतेसाठी छात्रभारतीचे प्रदेश कार्याध्यक्ष संदीप आखाडे, उपाध्यक्ष राकेश पवार, संघटक लोकेश लाटे, रोहित ढाले, स्वप्निल मानव, राज्य कार्यकारणी सदस्य अनिकेत घुले, भूषण महाजन, मंगेश निकम, गणेश बोराडे, दीपक देवरे, सचिन बनसोडे, अमरीन मोगर, तुकाराम डोईफोडे, रशिद मणियार, समाधान बागुल, संदीप जाधव, राहुल मोरे, दशरथ चाबुकस्वार, सुरज दाभाडे, गिरीष उमाळे, स्थानिक संयोजक रवि गुंजाळ, प्रमोद मोदड, तृप्ती जोर्वेकर, पल्लवी लोहकरे, पुष्पा चासकर, अश्विनी शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.