जेऊर येथील बायजामाता यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:19 AM2021-05-24T04:19:32+5:302021-05-24T04:19:32+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. जेऊर गावचे आराध्य ...
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.
जेऊर गावचे आराध्य दैवत देवी बायजामाता यात्रोत्सव वैशाख बुद्ध पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चालू वर्षी बुधवारी (दि.२६) होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. तीन दिवस चालणारा व दोन दिवस कुस्त्यांचे हगामा आयोजन होत असलेला यात्रोत्सव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. यात्रोत्सव काळात ग्रामस्थांच्या वतीने बनविण्यात येणारा वांगे भाकरीचा महाप्रसाद यात्रेचे वैशिष्ट्ये असते. बायजामाता देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. यात्रोत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी राज्य तसेच परराज्यातून भक्त दर्शनासाठी येत असतात. यात्रोत्सव काळात येथे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. बायजामाता यात्रोत्सव रद्द करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बायजामातेने एका जेवणाच्या डब्यात गाडीभरून आलेल्या लष्कराच्या सैनिकांना (इंग्रज) जेवण देऊन डब्यामध्ये अन्न शिल्लक राहिल्याची आख्यायिका सांगितली जाते. यावरूनच गावाला जेऊर नाव पडल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. देवीची पालखी (छबिना) मिरवणूक परंपरेने पवार पाटलांच्या वाड्यातून निघते तर देवीचे भगत म्हणून म्हस्के कुटुंबीयांना मान असतो.