शिवसेना सोबत आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण-बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 15:10 IST2019-10-25T15:10:17+5:302019-10-25T15:10:51+5:30
भाजप-शिवसेना यांचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली. मात्र, आज कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण बनू शकते, असा दावा कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात केला.

शिवसेना सोबत आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण-बाळासाहेब थोरात
संगमनेर : भाजप-शिवसेना यांचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली. मात्र, आज कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण बनू शकते, असा दावा कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात केला.
थोरात म्हणाले, या समीकरणासाठी आम्हाला वरिष्ठांकडून मान्यता घ्यावी लागेल. परंतु शिवसेनेने प्रथम मन बनविले पाहिजे.
भाजपच्या प्रभावाखाली रहायचे नाही, त्यांना घाबरायचे नाही. हे आता त्यांनी ठरविले पाहिजे. यासाठी वरिष्ठ पातळीवर आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत. गेल्या तीन महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने मला संगमनेर विधानसभा मतदारसंघात वेळ देता आला नाही.
काही वृत्तवाहिन्यांनी आपला पराभव होणार असल्याचे वृत्त दिले. त्याचा कार्यकर्ते व जनतेला त्रास झाला. असे वार्तांकन निंदा करण्यासारखे आहे, असेही थोरात म्हणाले.