राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरातांनी केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

By शेखर पानसरे | Published: April 12, 2023 03:27 PM2023-04-12T15:27:23+5:302023-04-12T15:30:10+5:30

अवकाळी पाऊस, गारपीटीने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत मिळावी, असे आमदार थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat inspected the constituency of Radhakrishna Vikhe; Interaction with farmers | राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरातांनी केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरातांनी केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

संगमनेर : अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (दि. १२) महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहता तालुक्यातील केलवड, पिंपरी, गोगलगाव, पिंपळस, दहेगाव येथे जाऊन पाहणी केली, तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

अवकाळी पाऊस, गारपीटीने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत मिळावी, असे आमदार थोरात म्हणाले. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीचे मोठे नुकसान झाले. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांनी मंगळवारी (दि. ११) वेगवेगळे दौरे करत तेथे जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार थोरात यांनी राहाता तालुक्यातील केलवड, पिंपरी, गोगलगाव, पिंपळस, दहेगाव येथे जाऊन पाहणी केली. 

थोरात यांच्यासमवेत सुरेश थोरात, राहता तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, डॉ. एकनाथ गोंदकर, नितीन सदाफळ, विक्रांत दंडवते, अविनाश दंडवते, मच्छिंद्र गुंजाळ, निलेश डांगे, संजय जेजुरकर, सचिन चौगुले, संदिप कोकाटे, बबन नळे, उत्तम मते, गणेश चोळके, जाकीर शेख, शिवप्रसाद आहेर, बाळासाहेब निरगुडे, विनायक निरगुडे, आण्णासाहेब निरगुडे,  विनायक दंडवते, सुधाकर दंडवते, समीर करमासे ,विशाल डांगे, अशोक ठाकरे, आबासाहेब आभाळे, सोमनाथ जेजुरकर, आबासाहेब आभाळे, बाबासाहेब चव्हाण, आण्णासाहेब वाघे, विशाल वाघमारे, सागर वाघमारे, लाला बनसोडे, सतिश डांगे, सुभाष निर्मळ आदी उपस्थित होते.

राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना शेती करताना मोठा खर्च करावा लागतो. अशातच अवकाळी पाऊस, गारपिटीने झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना वेळेवर मोठी मदत झाली. सहजतेने मदत उपलब्ध करून दिली होती. या सरकारनेही घोषणा न करता शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्याकरता भरीव मदत केली पाहिजे. झालेले नुकसान याचबरोबर बँकेचे असलेले कर्ज भरता येईल, एवढी तरी भरीव मदत झाली पाहिजे. असे आमदार थोरात म्हणाले.
 

Web Title: Balasaheb Thorat inspected the constituency of Radhakrishna Vikhe; Interaction with farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.