काँग्रेसच्या विचाराला डावलणे याचा अर्थ ‘फॅसिस्ट’ वृत्तीला ताकद देण्यासारखे बाळासाहेब थोरात : संगमनेरात पत्रकारांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 02:56 PM2021-12-04T14:56:02+5:302021-12-04T14:57:15+5:30
संगमनेर : काँग्रेस हा केवळ पक्ष नसून तो एक विचार, तत्वज्ञान आहे. ते राज्यघटनेशी निगडित आहे. त्यामुळे हा पक्ष पुढील काळातही शाश्वत पद्धतीने काम करत राहणार आहे. - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर : काँग्रेस हा केवळ पक्ष नसून तो एक विचार, तत्वज्ञान आहे. ते राज्यघटनेशी निगडित आहे. त्यामुळे हा पक्ष पुढील काळातही शाश्वत पद्धतीने काम करत राहणार आहे.
कठीण दिवस येतील-जातील. परंतू ते तत्वज्ञान आपण डावलू शकत नाही, हीच वस्तुस्थिती आहे. म्हणूनच काँग्रेसला डावलणे म्हणजे तत्वज्ञानाला, विचाराला आणि राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाला डावलण्यासारखे आहे. काँग्रेसच्या विचाराला डावलणे याचा अर्थ ‘फॅसिस्ट’ वृत्तीला ताकद देण्यासारखे आहे. असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात शनिवारी (दि.४) विविध विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. सामनाच्या अग्रलेखाबाबत विचारले असता त्यात केलेली मांडणी योग्य असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री थोरात यांनी दिली.