'जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल, असे होणार नाही', बाळासाहेब थोरातांची टीका

By शेखर पानसरे | Published: June 30, 2023 07:40 PM2023-06-30T19:40:40+5:302023-06-30T19:40:54+5:30

बाळासाहेब थोरातांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला निशाणा.

Balasaheb Thorat strongly criticized the Shinde-Fadnavis government. | 'जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल, असे होणार नाही', बाळासाहेब थोरातांची टीका

'जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल, असे होणार नाही', बाळासाहेब थोरातांची टीका

संगमनेर: शिंदे-फडणवीस सरकार विकासाच्या मुद्यांवर मते मागू शकत नसल्याने सध्या सर्वत्र जाहिरातबाजी केली जाते आहे. मात्र, जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल, असे होणार नाही. वाढलेली महागाई, बेरोजगारी यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि सरकार केवळ जाहिरात बाजी करण्यात व्यस्त आहे. अशी टीका माजी महसूलमंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

शुक्रवारी (दि.३०) संगमनेरात आमदार थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या राज्यात आलेले सरकार हे लोकशाही पद्धतीला मान्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या सरकारच्या येण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढले आहे. बेकायदेशीर आलेले व सरकार टिकले असले तरी जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड असंतोष आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातात यावरून या सरकारमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास नाही. कितीही जाहिरात बाजी केली असली तरी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनता आपले सरकारविरोधी मत व्यक्त करेल. असेही थोरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Web Title: Balasaheb Thorat strongly criticized the Shinde-Fadnavis government.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.